Hug Day 2019:  या '5' प्रकारच्या मिठी देण्याच्या अंदाजातून लाखो शब्दांशिवाय बरंच काही बोललं जातं, पहा प्रत्येक मिठीचा अर्थ काय?
Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

Happy Hug Day 2019:  व्हेलेंटाईन वीक (Valentine's Week) मधला आजचा सहावा दिवस खास आणि शब्दांपलिकडे जाऊन बोलण्याचा दिवस आहे. बॉलिवूड सिनेमातून मुन्नाभाईने आपल्याला एक जादूची झप्पी काय जादू करू शकते? हे दाखवले. समोरच्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता जेव्हा शब्दातून मांडता येत नाही तेव्हा एक मिठी अनेक शब्दांचा काम पूर्ण करून जाते. मग आज तर तुमच्या व्हेलेंटाईन वीक मध्ये 'हग डे'(Hug Day 2019) चं सेलिब्रेशन आहे. मग पहा मिठी मारण्याच्या अंदाजावरून समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमक्या कोणत्या भावना नकळत ते तुमच्याकडे व्यक्त करत आहेत. Happy Hug Day 2019: 'हग डे'च्या दिवशी ही Romantic Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS शेअर करून साथीदाराला द्या जादूची झप्पी

Bear Hug

बिअर हग ही एकमेकांना दिलेली घट्ट मिठी असते. लाखो शब्दांत जे मांडता येत नाही ते या अवघ्या काही सेकंदाच्या मिठीत शब्दांवाचून समोरच्या पर्यंत पोहचवता येतं. अत्यंत जवळची आणि प्रेमाची माणसं अशाप्रकारची मिठी देतात. नकळत प्रेमापोटी वाटत असलेली भीती, ऑब्सेशन यामधून निर्माण झालेला ताण हलका होतो. तुमच्या साथीदाराकडून अशाप्रकारची मिठी मिळत असेल तर ती व्यक्ती नात्याबद्दल कमिटेड असते.

Polite Hug

साधारण कामाच्या निमित्ताने एकत्र असल्यानंतर एकमेकांच्या कामाचं, त्याच्या स्वभावाचं कौतुक करताना पोलाईट हग दिली जाते. साधारणपणे दोन्ही व्यक्तींकडून एकाबाजूने दिलेल्या या मिठीमध्ये शरीराच्या अप्पर बॉडीच्या केवळ काही भागांचा एकमेकांना स्पर्श होतो. अनेकदा नात्यामध्ये मोकळीक नसते पण केवळ 'फॉर्मॅलिटी' म्हणून अशाप्रकारे भेट दिली जाते. अशा नात्यामध्ये अनेकदा दोघांमध्ये बरंच अंतर असतं.

One-Way Hug

वन वे हग या शब्दामध्येच त्याच्या प्रकाराबद्दल समजतं. यामध्ये केवळ एकच व्यक्ती मिठीत असते. समोरच्या व्यक्तीकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. यामध्ये नात्यात किंवा त्या क्षणी केवळ एकाच व्यक्तींकडून भावना मोकळ्या केल्या जातात. अनेकदा मैत्रीमध्ये अशा प्रकारची मिठी दिली जाते.

Intimate Hug

जेव्हा दोघं मिठीतही असतात आणि त्यांची एकमेकांकडे नजरानजरही होते तेव्हा तो क्षण खास होतो. ही Intimate Hug आहे. नजरेतली जादू त्यांना नात्याबददल आत्मविश्वास देते.

Back Hug

बॅक हग हा प्रकारदेखील तितकाच खास आहे. यामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्ही विश्वास आणि संरक्षण या भावना नकळत व्यक्त करून जाता. अनेकदा मुलांना पालकांकडून अशाप्रकारची हग मिळते. तुम्हांला अशाप्रकारे मिठी मिळत असेल तर ती व्यक्ती तुमच्या पाठीशी आहे, ही भावना नकळत बोलत असते. अनेकदा सरप्राईज म्हणूनही अशाप्रकारची मिठी दिली जाते. आणि जर तुम्ही कोणाला मागून मिठी देत असाल तर त्याच्या रक्षणासाठी तुम्ही आहात ही भावना व्यक्त करताय.

मिठी ही केवळ प्रेम किंवा रोमान्स व्यक्त करण्याचा एक प्रकार नाही. अनेकदा कामाच्या व्यापात, प्रत्येकजण त्याच्या मानसिक स्वरूपात अनेक  लहान मोठ्या गोष्टींशी झगडा करत असतो. अशावेळेस जवळच्या व्यक्तीकडून मिळालेली एक मिठी अनेक भावना मोकळ्या करून जाते. नकळत तुम्ही समोरच्या व्यक्तीवरील अदृश्य ताण हलका करता. त्याला पुन्हा नव्याने उभं रहायला उमेद देता. त्यामुळे आज तुमच्या व्हेलेंटाईनसोबतच तुमच्या जवळच्या व्यक्तींनाही एक घट्ट मिठी द्यायला विसरू नका.