
Happy Guru Purnima 2021: शिक्षक दिना प्रमाणेच हिंदू संस्कृतीमध्ये गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे गुरू पौर्णिमा. आजचा आषाढ पौर्णिमेचा दिवस हा गुरू पौर्णिमा. हिंदू धर्मामध्ये गुरू पौर्णिमा (Guru Purnima) हा दिवस व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा शुक्रवार, 23 जुलै दिवशी गुरू पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. गुरू-शिष्य परंपरेमध्ये व्यासांना (Vyas Guru) सर्वश्रेष्ठ गुरू मानले जाते त्यामुळे सर्व ज्ञानाचा उगम त्यांच्यापासून झाला अशी धारणा मनात ठेवून व्यास पौर्णिमा ही गुरू पौर्णिमा म्हणून साजरी करताना आपल्या आयुष्यातील सार्या गुरूंच्या प्रति आदर, प्रेम,सदभावना व्यक्त करण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यंदा कोरोना संकटामुळे तुम्ही तुमच्या गुरूवर्यांना भेटण्यासाठी बाहेर पडू शकत नसाल तर सोशल मीडीयात मराठमोळे मेसेजेस, Wishes, Quotes, HD Images, Gifs, Greetings शेअर करत या दिवसाचं मांगल्य तुम्ही वाढवू शकतात. नक्की वाचा: Guru Purnima 2021 Date: यंदा कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून या दिवसाचे महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा विधि.
प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे आई -वडील हे पहिले गुरू असतात. नंतर शाळा, कला, विद्या अवगत करताना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर अनेक गुरू भेटतात. प्रत्येकाची संगत, सहवास आपल्याला अनुभव देत जाते आणि त्यामधूनच आपण घडत जातो त्यामुळे गुरूरूपी त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आज व्यास पौर्णिमा, गुरू पौर्णिमा दिवशी आपली कृतज्ञता नक्की व्यक्त करा.
गुरू पौर्णिमा मराठी मेसेजेस

क्षणाक्षणाचा परीक्षार्थी
अद्ययावत ज्ञानार्थी
ज्ञानदान करूनिया
घडवी विद्यार्थी
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

ज्ञान, व्यवहार, संयम, सदबुद्धी आणि आत्मविश्वास
देणार्या माझ्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला वंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

आई तूच माझी पहिली गुरू
तुझ्यापासून हे जग सुरू
आजच्या गुरूपौर्णिमेच्या दिवशी
तुला त्रिवार अभिवादन!

सार्या गुरूवर्यांना
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

ज्ञान रूपी प्रकाश असलेल्या
'गुरू'ला माझे वंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अध्यात्मिक क्षेत्रातही आज अनेक 'गुरू' रूपी मंडळी काम करत आहेत. नृत्य, संगीत,कला क्षेत्रात गुरू पौर्णिमेचे आजही विशेष महत्त्व आहे. या दिवसाचं निमित्त साधत गुरू-शिष्य परंपरा जपली जाते. सध्या गुरूकुल परंपरा नसली तरीही काही अंशी ती आजच्या एका दिवसाच्या निमित्ताने जपण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या अशाच खास 'गुरू'ला आज तुमच्या मनातील त्यांच्याप्रतीचा आदर नक्की शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून पोहचवा.