Guru Purnima Wishes in Marathi: ज्या महान ऋषिमुनींना महाभारत, पुराणे लिहिली त्यांना थोर व्यासमुनींना वंदन करण्याचा हा दिवस गुरुपौर्णिमा (Guru Purnima) वा व्यासपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच आषाढ शुद्ध पौर्णिमेला येणा-या गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरुंना वंदन करणे त्यांच्या पुढे नतमस्तक होणे शुभ मानले जाते. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. अशा या महान सणाच्या आपल्या गुरुंना शुभेच्छा देण्यासाठी आपण जिडिटल प्लॅटफॉर्म हे माध्यम निवडू शकता.
यंदा कोरोना व्हायरस मुळे आपण आपल्या गुरुंना प्रत्यक्षात भेटायला जाऊ शकत नाही. मात्र फोन करुन किंवा फोनवरुन संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
हेदेखील वाचा- Sai Baba Marathi Songs: साईबाबांची ही 5 सुरेल मराठी गाणी आणि भजने ऐकून भक्तिमय वातावरणात करा गुरुपौर्णिमा साजरी
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय. अशा या महान दिवसाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा!