Gatari Amavasya 2021 Funny Messages: आषाढी अमवस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जाते. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी येणाऱ्या या अमावस्येनिमित्त मासांहारवर पुरेपूर ताव मारला जातो. मासांहाराच्या विविध पदार्थांची रेलचेल असते. मासांहारप्रेमी नॉन व्हेज आणि मद्य या दोन्हींचा आस्वाद घेऊन गटारी सेलिब्रेट करतात. यंदा गटारी अमावस्या रविवार, 8 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. या निमित्ताने मराठी Wishes, Messages, Funny Jokes, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारे शेअर करुन मासांहारप्रेमींना शुभेच्छा द्या. (Gatari Amavasya 2021 Date: यंदा कधी साजरी होणार गटारी? श्रावण सुुरु होण्यापूर्वी 'या' दिवशी घेऊ शकता नॉन व्हेजचा आस्वाद)
गटारी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी पासूनच श्रावण सुरु होत आहे. व्रतवैकल्यांच्या या काळात मासांहार, मद्य वर्ज्य केले जाते. त्यामुळे गटारी दिवशी चिकन, मटण, मासे, अंडी यांचे विविध पदार्थ खावून आत्मतृप्ती केली जाते. काहीजण विकेंड पिकनिकही प्लॅन करतात. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने बाहेर जावून सेलिब्रेट करणे, गर्दी करणे धोक्याचे आहे. परंतु, तुम्ही गटारी घरच्या घरी सेलिब्रेट करु शकता.
गटारीच्या शुभेच्छा!
ओकू नका, माकू नका
मटणावर जास्त ताव मारु नका
फुकट मिळाली तर ढोसू नका
दिसेल त्या गटारात लोळू नका
गटारीच्या शुभेच्छा!
सुकी मच्छी
मटणाचा रस्सा
सगळं घेऊन यंदा
घरीच बसा!
गटारीच्या शुभेच्छा!
संपली केव्हाच आषाढीची वारी
चला आता जोरात करु तयारी!
थोडेसेच दिवस हातात आहेत
जोरात साजरी करूया गटारी!
मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या लॉकडाऊन असताना
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!
कोंबडीचा रस्सा मटणाचा साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी अमावस्या 'दीप अमावस्या' म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून लख्ख केले जातात. ते लावून त्यांची पूजा केली जाते. खीर-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर श्रावणातील व्रत वैकल्यांना सुरुवात होते.