श्रावण महीना हा सगळ्यात पवित्र असा महीना समजला जातो. हा महीना सुरु होण्या आधी आषाढ महिन्याच्या शेवटी 'आषाढ अमावस्या' साजरी केली जाते. त्याला 'गटारी अमावस्या' असे ही म्हटले जाते. यंदा 8 ऑगस्ट रोजी गटारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अनेकांच्या घरात नॉनव्हेज चा चमचमीत बेत करुन त्यावर ताव मारला जातो. कारण त्यानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार आणि दारु वर्ज केली जाते काही लोक गणपती गेल्यावरच मांसाहाराचे सेवन करतात. त्यामुळे नॉनवेज प्रेमींसाठी गटारीचा हा दिवस खुप खास असतो. (Gatari Amavasya 2021 Date: यंदा कधी साजरी होणार गटारी? श्रावण सुुरु होण्यापूर्वी 'या' दिवशी घेऊ शकता नॉन व्हेजचा आस्वाद)
अशा या खास दिवशी आपल्या मित्र परिवाराला अनोख्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास गटारी स्पेशल ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status, HD Images ज्याच्या माध्यमातून तुम्ही गटारीच्या शुभेच्छा देऊ शकता.
अनेक घरांमध्ये आठवड्यातील 3 दिवस मासांहार केला जातो. बहुतांश रुपाने ते वार बुधवार, शुक्रवार आणि रविवार असतात. त्यामुळे रविवारच्या आधी बुधवार, 4 ऑगस्ट आणि शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी तुम्ही गटारी सेलिब्रेट करु शकाल.