Happy Dussehra 2020 Wishes Images: 25 ऑक्टोबर 2020 रोजी नऊ दिवसांचा शारदीय नवरात्रोत्सवाची (Navaratri) सांगता होत आहे. विजयादशमी अर्थात दसरा, मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा सण आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन तो साजरा केला जातो. दसरा अनेकांना दिवाळी उत्सवाची तयारी सुरू करण्यास प्रेरित करतो. आपल्या सर्व जवळच्या मित्र आणि कुटूंबियांसमवेत एकत्र जमून पारंपारिकपणे साजरा केला जाणारा दसरा कोरोनामुळे यंदा छोट्या स्तरावर साजरा केला जाईल. मात्र, दसऱ्यानिमित्त यंदा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करू शकतो. आणि म्हणून आम्ही आपल्यासाठी दसरा (Dussehra) 2020 च्या नवीनतम फोटो शुभेच्छा, रावण दहन एचडी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी घेऊन आलो आहोत. (Dussehra Wishes In Marathi: दसऱ्याच्या खास मराठी शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, SMS, HD Greetings, Wallpapers आणि शुभेच्छापत्र देऊन आनंदाच साजरा करा विजयादशमीचा सण!)
दसऱ्याच्या काही ठिकाणी पुस्तक पाटीवर सरस्वती देवीची रांगोळी काढून तिचे पूजन करण्याचीदेखील प्रथा आहे, तर काही जणं या दिवशी घरातील शेतीत वापरण्याच्या सर्व सामग्रीची पूजा करतात. यंदा कोरोना काळ सुरु असल्याने आपण आपल्या मित्रांना, प्रियजनांना WhatsApp Stickers आणि GIF Greetings पाठवून सणाचा आनंद लुटू शकतात.
व्हॉट्सअॅप संदेशः भक्ती, निश्चय आणि समर्पण सह, रामने आज लोकं जिंकली. जय श्री राम. दसरा 2020 च्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप संदेशः हा दसरा तुमच्या आयुष्यात आनंद, सुख आणि समृद्धी आणो. शुभ दसरा!
व्हॉट्सअॅप संदेशः रावणवर श्री रामाच्या विजयाचे प्रतीक, विजयादशमीच्या पावन परवाच्या हार्दिक शुभेच्छा!
व्हॉट्सअॅप संदेशः आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
पहा व्हिडिओ: दसरा 2020 च्या हार्दिक शुभेच्छा
दरम्यान, दसरा देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी वेगवेगळे महत्व दर्शवतो. भगवान रामाने रावणचा वाढ करून सीतेची सुटका केली म्हणून उत्तर भारतातील लोक दसरा साजरा करतात, भारताच्या दक्षिणेकडील भागातील लोक, दुर्गापूजेच्या समाप्तीची आणि म्हैस असुर, म्हैशासुराविरूद्ध देवी दुर्गाचा विजय म्हणून हा दिवस साजरा करतात.