
Happy Dasara 2020 Wishes In Marathi: अश्विन महिन्यात दशमी तिथीला संपूर्ण देशात दसरा किंवा विजयादशमीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमीला शुभ मुहूर्त बघितल्या शिवाय देखील शुभ कार्य करता येऊ शकतं. हा दिवस अत्यंत शुभ समजला जातो. या दिवशी अनेक लोक आपल्या नवीन व्यवसायाचा किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्याचा शुभारंभ करतात. याशिवाय या दिवशी सोन खरेदी करण्याचीदेखील परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणून दसऱ्याच्या मुहुर्तावर अनेकजण आपल्या नवीन उद्योग-धंद्याला सुरुवात करतात. दसऱ्याच्या दिवशी गोड किंवा पुरण पोळीचं जेवण केलं जात. या दिवशी संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची असतात. या दिवशी सर्व लहान मुलं आपल्या घरातील ज्येष्ठाचा आशीर्वाद घेतात.
दसऱ्याच्या दिवशी घरातील शेतीत वापरण्याच्या सर्व संघाची पूजा केली जाते. तसेच काही ठिकाणी पुस्तक पाटीवर सरस्वती देवीची रांगोळी काढून तिचे पूजन करण्याचीदेखील प्रथा आहे. यंदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत देण्यासाठी WhatsApp Status, SMS, HD Greetings, Wallpapers आणि शुभेच्छापत्र वापर करून विजयादशमी सणाचा आनंद द्वगुणित करा... (हेही वाचा - Dussehra 2020 Special Ukhane: दसरा सणाच्या निमित्ताने सुवासिनींनी घ्या 'हे' उखाणे आणि विजयादशमी साजरी करा आनंदाने!)







यंदा दसऱ्याचा सण 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. दसऱ्याचा सण दिवाळीच्या 20 दिवस आधी साजरा केला जातो. यावर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहे. 24 ऑक्टोबर सकाळी 6 वाजून 58 मिनिटापर्यंत अष्टमी आहे. त्यानंतर नवमी लागत आहे. त्यामुळे यंदा दसरा 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.