
Happy Doctor's Day 2020 Marathi Wishes: भारताचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ बिधान चंद्र रॉय (Dr. B.C. Roy) यांच्या सन्मानार्थ आणि त्यांना श्रद्दांजली म्हणून त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी म्हणजे 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. यंदा वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरस संकटामुळे या डॉक्टर्स दिन साजरा करण्याला आणखीनच महत्व आले आहे, आपण सर्वच जाणतो मागील तब्बल तीन महिन्यांपासून आपल्या घरापासून लांब राहून, जीवाची पर्वा न करता, डॉक्टर मंडळी अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेसाठी त्यांना निदान शुभेच्छा देऊन आपण कौतुक करू शकतो, किंबहुना तेव्हा करायलाच हवे. यासाठी आम्ही काही खास शुभेच्छापत्रं तयार केली आहेत. यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आम्ही बनवलेले हे मराठी भाषेतील संदेश, शुभेच्छा, ग्रीटिंग्स, Images तुम्ही तुमच्या WhatsApp Status, Facebook व अन्यही सोशल मीडियावरून शेअर करू शकता.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मराठी शुभेच्छा
1) देवासारखे येती धावून
देवासारखे करतात काम
माणसातल्या देवाला या
सदैव आमचा सलाम
डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा!

2)काळ वेळ न पाहता जे होतात रुग्णसेवेत रुजू
सांगा डॉक्टर तुमचे उपकार कोणत्या शब्दात मोजू
डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



5) कोरोना विरुद्धच्या प्राणघातक लढ्यात ढाल बनून उभे राहिलेल्या सर्व डॉक्टरांना सविनय प्रणाम
डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

भारतामध्ये नॅशनल डॉक्टर्स डे साजरा करण्याची सुरूवात 1991 साली तत्कालीन सरकार कडून झाली. त्यानंतर दरवर्षी 1 जुलै दिवशी नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. डॉ बिधान चंद्र रॉय यांना आदरांजली अर्पण केली जाते. भारतामध्ये प्रत्येक वर्षी एका विशिष्ट थीमवर नॅशनल डॉक्टर्स डेचं आयोजन केले जाते.