
दिवाळी (Diwali) हा देशभरात साजरा करण्यात येणारा सर्वात महत्वाचा सण. देशातील प्रत्येक राज्यात दिवाळसण धुमधडाक्यात आणि आनंदात साजरा केला जातो. दिवाळीला भारतीय संस्कृतीतील (Indian Tradition) सर्वात मोठा सण म्हणतात. कारण हा सण एक दोन नाही तर पाच दिवसांचा असतो. पहिला दिवस धनोत्रयादशीचा (Dhanotrayadashi), साडेतीन मुहुर्तापैकी एक असणारा हा दिवस आहे. तुम्ही कुठलं नवीन काम किंवा नवीन वस्तुची खरेदी करण्याचं नियोजन करत असाल तर हा दिवस सर्वोत्तम. दिवाळीचजा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी (Narak Chaturdashi) या दिवसाची सुरुवात अभ्यंग स्नानाने केली आहे. उटणं लावून आंघोळ करणं याविधीस या दिवशी विशेष महत्व आहे. तिसरा आणि दिवळीच्या पाच दिवसातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा (Laxmi Pujan). या दिवशी देवी लक्ष्मीची भक्ती भावाने पूजा केली जाते. चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा (Balipratipada), या दिवशी गुरु ढोरांची पूजा केली जाते. तर पाचवा आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaubeej). हा दिवस बहिण भावासाठी खास असतो.
दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्नेहाचा सुगंध दरवळला.आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी, दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा!