Happy Diwali 2020| File Images

Happy Diwali Marathi Wishes and Messages: दिवाळी म्हणजेच दीपावली (Deepavali) हा भारतामधील सणांचा राजा आहे. दीपावली या शब्दांतच त्याचा अर्थ दडला आहे. दीप म्हणजे दिवे आणि आवली म्हणजे ओळ. दिव्यांची रांग लावत सर्वत्र झगमगाट करणारा हा सण दीपोत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi) दिवस म्हणजे दिवाळीचा प्रमुख दिवस. यानंतर लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan), दिवाळी पाडवा (Diwali Padwa) किंवा बलिप्रतिपदा (Bali Pratipada) आणि भाऊबीज (Bhaubeej) हे दिवस साजरे करून दीपावलीचं पर्व साजरं केलं जातं. यंदा कोरोना वायरसचं मोठं आरोग्य संकट या दिवाळीच्या सणावर आहे. त्यामुळे यंदा दिवाळी अगदी जवळच्या व्यक्तींसोबत आणि साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र दु:खाकडून आनंदाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि नैराश्याकडून उत्साहाकडे घेऊन जाणारा सण ऑनलाईन माध्यमातून साजरा करून तुम्ही दिवाळीच्या शुभेच्छा (Happy Diwali) मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना नक्कीच देऊ शकता. या सणाच्या निमित्ताने दिवाळी शुभेच्छा, दिवाळी मराठी संदेश, शुभ दीपावली (Shubha Deepavali) म्हणत व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबूक स्टेटसच्या (Facebook) माध्यमातून मराठमोळी ग्रीटिंग्स (Greetings), शुभेच्छापत्र, एसएमएस (SMS), मेसेजेस, Wishes, GIFs याद्वारा शेअर करून दिवाळीचा आनंद दूर राहून देखील द्विगुणित करू शकता.

यंदा दिवाळी कोविड 19 च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक आणि गर्दी टाळत, सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं पालन करत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात गाठी भेटी घेणं, भेटवस्तूंची देवाणघेवाण टाळा आणि सोशल मीडियात व्हर्च्युअली एकत्र येऊन साजरी करत सार्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. Happy Diwali 2020 Messages in Marathi: दीपावलीच्या शुभेच्छा Greetings, WhatsApp Status द्वारे देऊन मंगलमयी वातावरणात करा दिवसाची सुरुवात!

दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

उटणं, अभ्यंग तेलाला आज चंदनाचा सुवास

दारोदारी दिव्यांची आरास

ताटात लाडू-चकल्या अन फराळाचा बेत खास

स्वागत करू तेजस्वी पर्वाचे

झाली दिवाळी पहाट

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

दिव्याने दिवा जळत राहो

मनाने मनं जुळत राहो

तुम्हा प्रत्येकाच्या घरात

आज लक्ष्मी करो वास

सुख, समृद्धी घरी येवो

आनंद प्रत्येकाच्या घरात नांदो

दिवाळीच्या  हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

दिवाळी सणाच्या तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला

लाख -लाख शुभेच्छा, हा दीपोत्सव तुमच्या आयुष्यात

सुख, समाधान, समृद्धी घेऊन येवो हीच आमची कामना

शुभ दीपावली

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

आयुष्याच्या अंगणी दिव्यांचा येवो प्रकाश सोनेरी

सुख-समाधानाची उधळण होवो तुमच्या जीवनी

प्रेमाच्या गंधात न्हाऊनी आली दिवाळी आली दिवाळी

शुभ दीपावली

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

अत्तर, उटण्याचा मंद सुगंध घेऊन आली आज दिवाळी पहाट

दिव्याच्या सोनेरी तेजाने उजळून जावो वहिवाट

दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali Wishes In Marathi | File Images

आकाशकंदील अन पणत्यांची रोषणाई

फराळाची लज्जत न्यारी

नव्या नवलाईची ही दिवाळी

झगमगली दुनिया सारी

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी दिवाली!

via GIPHY

via GIPHY

दिवाळी मध्ये चार महत्त्वाचे सण किंवा दिवस असले तरीही यंदा दिवाळी 2 दिवस आहे. 14 नोव्हेंबरचा दिवाळीचा अभ्यंगस्नान म्हणजे पहिल्या आंघोळीचा दिवस आहे. या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पुजन एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. तर 16 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी होईल. त्यामुळे दिवाळीच्या या दोन दिवसांत तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा हा दिवाळीचा सण तुम्हा-आम्हा सार्‍यांच्याच आयुष्यात पुन्हा आनंदाचे, उत्साहाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो, हीच कामना! हॅप्पी दिवाली.