Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

Diwali 2020 Messages in Marathi: दिवाळी म्हटलं की सगळीकडे रोषणाई, सुरेख रांगोळी, घराघरात फराळांचे दरवळणारे सुवास, आकाश कंदिल, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींनी सारा आसंमत देखील उजळून निघतो. दिवाळीच्या (Deepavali) पहिल्या दिवशी उटण्याने छान अभ्यंग स्नान करुन, कारेट फोडून मंगलमयी वातावरणात दिवसाची सुरुवात होते. मात्र यंदा दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजन हे एकाच दिवशी आल्याने लोकांना उत्साह देखील दुप्पट असणार आहे. एव्हाना दिवाळीत (Diwali 2020) काय करायचे, काय खायचे याचे बेत रंगले असतील. पण या सर्वांसोबत आपल्या जवळच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणं देखील विसरू नका बरं.

पूर्वी दूरध्वनीवरून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जायच्या मात्र जसजसा काळ बदलत गेला तेव्हा या दूरध्वनीचा जागा मोबाईलने घेतली आणि मोबाईलमधून सोशल मिडिया समोर आला. या सर्वांच्या माध्यमातून मेसेजेस, इमेजेस, व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जाऊ लागल्या. यंदा तर कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगचा विचार करता एकत्रित येऊन हा सण साजरा करण्यापेक्षा लोक एकमेकांना छान मराठीतून शुभेच्छा संदेश पाठवू शकतील.

 लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी

   तुमच्या घरी सुख-समृद्धी येऊ दे

  रांगोळीच्या सप्तरंगात

  सुखाचे दिप उजळू दे

   दिपावली च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा

   कोरोनाची काळी छाया दूर होवो हीच मनी आशा

  आनंदी-आनंद पसरू दे दाही दिशा

   तुम्हा सर्वांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा

   Happy Diwali

Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

 सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली

   आनंदाची उधळण करत आली दिवाळी आली

   दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

हेदेखील वाचा- Diwali 2020 Invitation Cards in Marathi: दिवाळीच्या शुभेच्छा देत मित्रमंडळी, प्रियजनांना फराळाचं ऑनलाईन आमंत्रण देण्यासाठी खास Messages Formats!

Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

नवे-जुने विसरूनी जावे

   सण साजरी करण्यासाठी एकत्र यावे

   दिव्यांच्या लख्ख प्रकाशासारखे

   आपले भविष्य उज्ज्वल करावे

   दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

उठा उठा सकाळ झाली

    लक्ष दिव्यांची आरास झाली

    आनंदी-आनंद घेऊनि आली

    आली आली दिवाळी आली

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Diwali 2020 Wishes in Marathi (Photo Credits: File)

या मराठीतील दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठविण्यासाठी कामी येतील. यंदाची दिवाळी घरातही तुम्ही तितकीच आनंदाने आणि उत्साहाने साजरी करू शकता.