Dahi Handi 2024: श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा आनंद तो ज्या प्रमाणे मडक्यात ठेवलेलं लोणी खाण्यासाठी सवंगड्यांसोबत थर रचून मडकी फोडत होता त्याचप्रमाणे करण्यासाठी दहीहंडी हा खेळ खेळला जातो. दहीहंडीचा ( Dahi Handi ) खेळ आव्हानात्मक आणि थरारक असतो. थरावर थर रचून ते फोडणारे जितकं लक्ष देऊन हा खेळ असतात तेवढेच हा खेळ पाहणार्यांसाठी देखील ते क्षण चित्तथरारक असतात. यंदा दहीहंडीचा खेळ 27 ऑगस्ट दिवशी खेळला जाणार आहे. मग या खास दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि गोविंदा पथकातील सहकार्यांना WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Dahi HandiQuotes, Photos द्वारा देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
दहीहंडी खेळण्याचा उत्साह अगदी चिमुकल्या राधा-कृष्णांपासून मोठ्या गोविंदा पथकांना असतो. मुली देखील गोविंदा पथकामध्ये उतरतात. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मुलींचा देखील गोविंदा पथकामध्ये समावेश असतो. मग हा थरारक खेळ पाहण्यासाठी जशी चढाओढ खेळाडूंमध्ये असते तशीच ती रस्त्यावर उतरून पाहणार्यांसाठी असते. Janmashtami 2024 Quotes In Marathi: श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा शेअर करा कृष्ण मुरारीचे प्रेरणादायी कोट्स.
दहीहंडीच्या शुभेच्छा
दहीहंडी हा साहसी खेळ आहे. आता सण समारंभांचे देखील मार्केटिंग होत असल्याने यामध्ये स्पर्धा अधिक झाली आहे. आता गोविंदा पथकांसाठी विविध स्पर्धांचे देखिल आयोजन केले जाते. सरकार कडून त्याला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे.