
Dahi Handi 2020 Marathi Wishes: आज देशभरात ठिकठिकाणी श्री कृष्ण जन्माष्टमीचा (Krishna Janmashtami) उत्सव पाहायला मिळत आहे. मंंदिरांंमध्ये श्री कृष्णाची विशेष पुजा केली जाईल, कोरोनाच्या संंकटामुळे भाविकांंना मंंदिरात प्रत्यक्ष दर्शनासाठी जाता येणार नाही मात्र यावर उपाय म्हणुन अनेक मंंदिरातुन पुजेचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे. जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी दही हंंडीचा मोठा उत्सव पार पडतो, मात्र यंदा कोरोनामुळे दही हंडीचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. अर्थात यामुळे गोविंंदा पथके नाराज असली तरी हा आपल्याच हिताचा निर्णय असल्याने सर्वांनी यास मान्य केले आहे. दही हंड्या रद्द झाल्या असल्या तरी आपण घरच्या घरी कृष्णाचे पुजन करुन भक्तीभावाने हा दिवस निश्चितच साजरा करु शकता. आणि हो तुमच्या गोविंंदा पथकातील मित्रांंना ऑनलाईन शुभेच्छा पाठवुन त्यांचा उत्साह वाढवु शकताच. यासाठीच दही हंडी आणि कोरोना असे दोन्ही मुद्दे धरुन आम्ही काही खास मराठमोळी शुभेच्छापत्र तयार केली आहेत. हे दहीहंंडी विशेष Wishes, Messages, GIFs, Whatsapp Status, Facebook वरुन नक्की शेअर करा.
दहीहंडी च्या मराठी शुभेच्छा





दही हंडी विशेष Gifs
दरम्यान, दहीहंडीच्या शुभेच्छा तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप स्टिकर्स डाऊनलोड करा आणि नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा. मुंंबईत सर्व दहीहंडी आयोजकांनी उद्याचे सोहळे रद्द केले आहेत. तुम्हीही सर्व गोविंदांनी या निर्णयाचे पालन करावे हीच विनंती!