
मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) एक दिवस आधी भोगीचा (Bhogi) सण साजरा केला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो मकरसंक्रांतीचा दिवस यंदा 15 जानेवारीला आहे त्यामुळे भोगीचा सण 14 जानेवारी दिवशी साजरा केला आहे. या दिवशी विधिवत पूजा करण्याची पद्धत आहे. काळे कपडे घालून मकरसंक्रांत आणि भोगी साजरी केली जाते. मग नव वर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांतीची धामधूम सुरू करणार्या भोगी सणाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही तुमच्या मित्र मंडळीचा, नातेवाईकांचा, प्रियजणांचा दिवस खास करू शकता. सोशल मीडीयात भोगीच्या शुभेच्छा Images, Wishes, Greetings, WhatsApp messages, Status द्वारा शेअर करून देऊ शकता.
भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी, ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. शेतीत नवीन आलेल्या पिकांचा आनंद साजरा करत यादिवशी घरोघरी खास बेत केला जातो.
भोगी सणाच्या शुभेच्छा





वातावरणातील गारवा आणि भोगी या सणाचे निमित्त साधून भोगी सणाला खास भाजी देखिल बनवली जाते. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी बनवण्याची महाराष्ट्रात पद्धत आहे. या सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.