Happy Bhogi 2022 Messages: भोगी निमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Wallpapers पाठवून मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!

Happy Bhogi 2022 Messages in Marathi: थंडीची चाहूल लागली जानेवारी महिन्यात थोडक्यात नववर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकरसंक्रात (Makar Sankranti). या दिवशी एकमेकांना तिळगूळ-लाडू दिले जाते. या सणाच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची विशिष्ट भाजी केली जाते. 'न नाही भोगी, तो सदा रोगी' हे वाक्य आपण अनेकदा ऐकत आलो आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाक-या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. माणसाच्या परस्परसंबंधांमद्ये स्नेह निर्माण व्हावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो.(Makar Sankranti 2022 Messages: मकर संक्रांतीनिमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या वर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा)

या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेटही देत असे. तर भोगी निमित्त Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Wallpapers पाठवून मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!

या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. थंडीतील विशेषत: नववर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फलदायी ठरते.