Makar Sankranti 2022 Messages: मकर संक्रांतीनिमित्त खास मराठी WhatsApp Status, Wishes, Images शेअर करून द्या वर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा
Makar Sankranti Message (File Image)

पंचांगानुसार, भारतामध्ये पौष महिन्यात ‘मकरसंक्रांत’ (Makar Sankranti 2022) हा सण साजरा केला जातो. यंदा मकर संक्रांतीचा सण शुक्रवार, 14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे. शेतीशी संबंधित या सणादिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सूर्यनमस्कार आणि सूर्य मंत्रांचा जप विशेष फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून त्याचा पुत्र शनिच्या मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्यदेवाची यात्रा दक्षिणायन ते उत्तरायण दिशेपर्यंत सुरू होते. त्यामुळे संक्रांतीनंतर दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. Happy Makar Sankranti 2022 Wishes In Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा WhataApp Messages, Greetings द्वारा देत प्रियजणांचा दिवस करा खास!

अशा प्रकारे मकर संक्रांतीचा थेट पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थानाशी संबंध आहे. संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. या दिवशी जप, तपश्चर्या, ध्यान आणि धार्मिक क्रिया अधिक महत्त्वाच्या आहेत. याला कापणीचा सण देखील म्हणतात. तर या खास दिवशी मराठी Facebook Messages, WhatsApp Status, Quotes, Wishes, GIFs, Images शेअर करून तुमच्या प्रियजनांना, मित्रांना, शेजाऱ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Makar Sankranti Message
Makar Sankranti Message
Makar Sankranti Message
Makar Sankranti Message
Makar Sankranti Message

दरम्यान, संक्रांतीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात भोगी साजरी होते. या दिवशी उपलब्ध असलेल्या सर्व भाज्या व तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुंगाची खिचडी असे पदार्थ केले जातात. याशिवाय मकर संक्रांतीलाही तिळ आणि गुळाला खूप महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाने स्नान केले जाते. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.