Eid al-Adha 2021 HD Images: मुस्लीम कालगणनेतील जिलहिज्ज या बाराव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी 'बकरी ईद' साजरी केली जाते. बकरी ईदला 'ईद-उल-अजहा' असेही म्हटले जाते. कुर्बानीचा उत्सव म्हणून बकरी ईद सर्वत्र अगदी उत्साहात साजरी केली जाते.  भारतात यावर्षी 21 जुलै रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे यावर्षीही बकरी ईदचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा, असे सरकारकडून मुस्लीम बांधवांना आवाहन करण्यात आले आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे नातेवाईक, प्रियजनांसोबत ईदीचा आनंद घेता येणार नाही. मात्र, तुम्हाला या बकरी ईदला आपल्या मित्रांना, परिवारला आणि नातेवाईकांना खालील सुंदर फोटो  (HD Images, Quotes and Wallpapers) पाठवून त्यांच्या आनंदात आणखी भर घालता येणार आहे.

इस्लामच्या धार्मिक मान्यतेनुसार पैंगबर हजरत इब्राहिम यांच्यापासून कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली आहे. इब्राहिम अलैय सलाम यांना कोणतेच अपत्य नव्हते. देवाला अनेकदा  साकडे घातल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या मुलाचे नाव इस्माईल ठेवण्यात आले. इब्राहिम आपला मुलगा इस्माईलवर खूप प्रेम करत असे. एके रात्री अल्लाहने इब्राहिमच्या स्वप्नात येत त्यांच्या आवडत्या गोष्टींची कुर्बानी मागितली होती. हे देखील वाचा-Eid al-Adha 2021: देशभरात येत्या 21 जुलै रोजी बकरी ईद साजरी होणार, चंद्र दिसल्यानंतर जामा मस्जिदीतील इमाम यांची घोषणा

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-
  
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-
 
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-
बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

तसेच, बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून धार्मिक कुर्बानी दिली जाते. मात्र, यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.