बकरीद मुबारक 2021 (Photo Credits: File Image)

Eid al-Adha 2021: ईदच्या सणानंतर लोक ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईदच्या सणाची वाट पाहली जाते. यंदा रविवारी बकरी ईद सण चंद्र दिसल्यानंतर केरळसह 21 जुलै रोजी ईद साजरी केली जाणार आहे. रविवारी दिल्ली जामा मस्जिदचे नायब शाही इमाम सैदय शाबान बुखारी (Syed Shaban Bukhari, Naib Shahi Imam Jama Masjid) यांनी घोषणा केली आहे.(Guru Purnima 2021 Date: यंदा कधी आहे गुरु पौर्णिमा? जाणून या दिवसाचे महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा विधि)

बकरी ईद चंद्र दिसल्यानंतर दिल्लीच्या जामा मस्जिदचे नायब शाही इमाम सैयद शाबाना बुखारी यांनी सण साजरी करण्यासंबंधित त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ जाहीर करत लोकांना सूचना दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, रात्री जुल हिज्जाचा चंद्र दिसला आहे. त्यामुळे बकरी ईदचा सण 21 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी खासियत अशी आहे की, केरळ मध्ये बकरी ईद अन्य देशांसह साजरी केली जाणार आहे.

Tweet:

तर इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रमुख पी हैदर अली शिहाब थंगल, समस्त अध्यक्ष मोहम्मद जिफरी मुथुकोया थंगल आणि अन्य उलेमा द्वारे संयुक्त रुपात 21 जुलै रोजी ईद उल अजहा साजरी केल्याची घोषणा जाहीर केली गेली आहे. याबद्दल मुफ्ती मुकर्रम यांनी असे म्हटले की, केरळमध्ये अरब देशांसह ईदचा सण साजरा केला जातो. मात्र असे काही वेळा झाले की, केरळ आणि देशातील अन्य भागात एकाच दिवशी सण साजरा केला जावा पण असे होत नाही. दरम्यान, बकरी ईदच्या सणावेळी बकऱ्याचा बळी दिला जातो. त्याचे मास तीन भागात वाटले जाते. त्यामधील एक भाग आपल्या परिवारासाठी, दुसरा नातेवाईकांसह मित्रांसाठी आणि तिसरा भाग गरीबांना दिला जातो.