Bakrid 2020 HD Images: बकरी ईद निमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपले परिवार, नातेवाईक आणि मित्रांना द्या खास शुभेच्छा!
Bakrid 2020 HD Images

Bakrid 2020 Wishes in Marathi: मुस्लिम बांधव बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. हा सण रमजान ईदच्या ठीक दोन महिन्यांनी साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार हा सण ईद-उल-अजहा या नावानेही ओळखला जातो. इस्लामिक कॅलेंडरच्या अखेरच्या महिना जु-अल-हिज्जमध्ये साजरा केला जातो. मुस्लिम लोक हा सण फर्ज-ए-कुर्बानी म्हणून साजरा करतात. या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. दरम्यान, बकरी ईदच्या दिवशी अनेकजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. मात्र, या बकरी ईदला आपल्या मित्रांना, परिवारला आणि नातेवाईकांना खालील सुंदर फोटो  (HD Images, Quotes and Wallpapers) पाठवून त्यांच्या आनंदात आणखी भर घालता येणार आहे.

इस्लामच्या धार्मिक मान्यतेनुसार पैंगबर हजरत इब्राहिम यांच्यापासून कुर्बानी देण्याची परंपरा सुरू झाली आहे. इब्राहिम अलैय सलाम यांना कोणतेच अपत्य नव्हते. अनेकदा देवाला साकडे घातल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या मुलाचे नाव इस्माईल ठेवण्यात आले. इब्राहिम आपला मुलगा इस्माईलवर खूप प्रेम करत असे. एके रात्री अल्लाहने इब्राहिमच्या स्वप्नात येत त्यांच्या आवडत्या गोष्टींची कुर्बानी मागितली होती. हे देखील वाचा- Happy Bakrid 2020 Messages: बकरीदच्या शुभेच्छा Wishes, Quotes, Greetings च्या माध्यमातून WhatsApp, Facebook वर शेअर करून साजरं करा कुर्बानी ईद चं पर्व

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा-

 

तसेच, भारतात येत्या 1 ऑगस्ट रोजी बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. बकरी ईद या सणाला ईद उल जुहा असेही म्हणतात. ईद-उल-जुहा हजरत इब्राहिमने केलेल्या त्यागाप्रित्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या दिनाचे प्रतीक म्हणून धार्मिक कुर्बानी दिली जाते. मात्र, यामागे एकच उद्देश असतो की, प्रत्येक मनुष्याने आपले जीवन हे ईश्वराची देणगी आहे असे समजावे, त्यामुळे त्याची रक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग किंवा बलिदान करण्यासाठी नेहमी तयारी दर्शवली पाहिजे.