
पाश्चात्य देशांमध्ये दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या दिवशी ‘एप्रिल फूल डे’ (April Fool's Day 2022) साजरा केला जातो. कधीकधी तो ‘ऑल फूल्स डे’ म्हणूनही ओळखला जातो. 1 एप्रिल ही अधिकृत सुट्टी नाही परंतु हा दिवस जगभरात एका व्यापक स्तरावर साजरा होतो. या दिवशी मित्र, कुटुंब, शिक्षक, शेजारी, सहकारी इत्यादींसोबत अनेक प्रकारचे खोडकर कृत्ये आणि इतर व्यावहारिक विनोद केले जातात, एकमेकांची चेष्टा-मस्करी केली जाते, एकमेकांवर विनोद केले जातात. यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नसतो, तर निव्वळ मनोरंजनासाठी हे केले.
पारंपारिकपणे न्यूझीलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या काही देशांमध्ये एप्रिल फूलचे विनोद दुपारपर्यंतच केले जातात. जर कोणी दुपारनंतर असा प्रयत्न केलाच तर त्या व्यक्तीला ‘एप्रिल फूल’ म्हटले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्येही एप्रिल फूलचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर अशा हा खोडकर दिवशी शेजाऱ्यांना, मित्रांना, जवळच्या लोकांना खास Messages, Images, Funny Jokes पाठवून एप्रिल फूलच्या शुभेच्छा देऊ शकता.





(हेही वाचा: यंदा धुमधडाक्यात साजरा होणार गुडी पाडव्याचा सण; मुंबईमध्ये 2 वर्षानंतर निघणार शोभा यात्रा)
दरम्यान, फ्रान्समध्ये तेरावे पॉप ग्रेगरी यांनी 1582 रोजी युरोपमध्ये ज्युलियन कॅलेंडर ऐवजी ग्रेगरियन कॅलेंडर वापरण्यास सांगितले. ज्युलियन कॅलेंडरमध्ये 1 एप्रिलला नवीन वर्ष साजरे केले जात असत, परंतु नवीन ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 1 जानेवारीला नवीन वर्षे साजरे करण्यास पॉप ग्रेगरी यांनी सांगितले. त्यानंतरही फ्रान्समध्ये काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते आणि त्यांना ‘एप्रिल फूल’ म्हटले जात होते. 1 एप्रिल हा दिवस जपानपासून ब्राझीलपर्यंत बहुतेक लोकांसाठी मजेशीर दिवस असतो, परंतु बर्याच ठिका तो एक परंपरा म्हणून साजरा होतो.