Happy April Fool's Day 2020 Wishes: एप्रिल फुल डे च्या निमित्त मराठी Messages, Images, Funny Jokes, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वरील मित्रांना द्या मजेशीर शुभेच्छा!
Happy April's Fool Day (Photo Credits: File Image)

दरवर्षी 1  एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे (April Fool Day) म्ह्णून साजरा केला जातो हे तर आपण जाणूनच असाल, या निमित्ताने छोटे मोठे Pranks करून हा दिवस साजरा केला जातो. नेहमीच्या टेन्शनमयी रुटीन मध्ये थोडीशी मस्करी करून आपला आणि आपल्या मित्रांचा मूड लाईट करण्याचे काम हा दिवस करतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्पष्ट आदेश देत सोशल मीडियावर चुकूनही अफवा किंवा खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा असे काही प्रॅन्क करण्याचा विचार करत असाल तर तो त्वरित थांबवा. पण प्रॅन्क करायचे नाहीत म्हणजे दिवसच साजरा करायचा नाही असा अर्थ मुळीच नाहीये. उलट तुम्ही काही मजेशीर मॅसेज शेअर करून तुमच्या मित्रमंडळींना व जवळच्या व्यक्तींना या एप्रिल फुल्ल दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. तुम्हाला हे मॅसेज शोधावे लागू नयेत याची सुद्धा सोय आम्ही केली आहे. हे काही रेडी टू सेंड मराठी Messages, Images, Funny Jokes, तुम्ही Facebook, WhatsApp आणि अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकाल.

April Fool's Day 2020 Jokes: एप्रिल फुल निमित्त Images, Funny Messages, GIf's च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करुन लोटपोट हसा!

एप्रिल फुल डे च्या शुभेच्छा

जेव्हा तू आरशा समोर जातोस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,

पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!

Happy April's Fool Day (Photo Credits: File Image)

तू चार्मिंग आहेस

तू इंटेलिजंट आहेस

तू क्युट आहेस

आणि मी ?

मी अशा अफवा पसरविणारा!

Happy April Fool's Day!

Happy April's Fool Day (Photo Credits: File Image)

जर कुणी तुला वेडा म्हटलं तर शांत रहा

जर कुणी तुला माकड म्हटलं तरी हसुन सोडुन दे

जर कुणी मुर्ख म्हटले तरीही त्याला माफ कर..

मात्र जर कुणी तुला स्मार्ट म्हटले तर

थोबाडीत दे त्याच्या..!

Happy April Fool's Day!

Happy April's Fool Day (Photo Credits: File Image)

2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी

14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी

15 ऑगस्ट : देशासाठी

1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !

Happy April Fool's Day!

Happy April's Fool Day (Photo Credits: File Image)

दरम्यान, लहानपणापासून 1 एप्रिलला मित्र-मैत्रिणींना खोटं सांगून शेंडी लावण्याची ही परंपरा आपण सर्वांनी अनुभवली आहे. यंदा आपल्या मित्रांना प्रत्यक्ष भेटून अशी गंमत करणे शक्य नसले तरी या ऑनलाईन शुभेच्छांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच दिवस साजरा करू शकता.