Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image

Hanuman Jayanti HD Images: चैत्र पौर्णिमे दिवशी रामभक्त हनुमानाचा जन्म झाला. त्यामुळे त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. संपूर्ण भारतभर हनुमानाचा जन्मदिन अगदी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी हनुमान मंदिरांमध्ये मोठी गर्दी होते. हनुमाला तेलाचे स्नान घातले जाते. रुईची फुलं आणि वडाच्या पानांच्या हार घालून हनुमानाला वंदन केले जाते. परंतु, यंदा कोरोना व्हायरस सावटामुळे मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. त्यामुळे देवळात जावून हनुमंताचे दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शुभेच्छा संदेश शेअर करुन  बजरंगबलीचा जन्मोत्सव साजरा करा.

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Greetings, HD Images, Wallpapers, Wishes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळींना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. (Hanuman Jayanti 2021 Wishes in Marathi: हनुमान जयंती च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे देऊन करा बजरंगबलीचा जन्मोत्सव साजरा!)

हनुमान जयंती शुभेच्छा!

Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image
Hanuman Jayanti 2021 HD Image | File Image

रामभक्त हनुमान हा अंजनी आणि केसरीचा पुत्र आहे. त्यामुळे अंजनीपुत्र म्हणूनही हनुमानाला संबोधलं जातं. त्याचबरोबर 'पवनपुत्र', 'बजरंगबली', 'मारुती' ही हनुमानाची अगदी प्रचलित नावं. भगवान रामाचा एकनिष्ठ भक्त आणि सेवक म्हणून हनुमंताची ख्याती आहे. हनुमानाला भगवान शिव यांचा 11 वा अवतार देखील मानला जातो. तरुणांना व्यायामाची गोडी लागावी आणि हनुमानाप्रमाणे शरीरयष्टी, ताकद प्राप्त व्हावी, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली आहेत.