Hanuman Jayanti Wishes in Marathi: भगवान शंकराचा रुद्रअवतार म्हणून ज्याला संबोधले जाते, त्या पवनपुत्र आणि रामाचा निस्सीम भक्त असलेल्या हनुमानाचा जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते. हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पंधराव्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यानुसार, यंदा 27 एप्रिलला ही हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2021) साजरी केली जाईल. या दिवशी देशभरात हनुमानाच्या मंदिरात मोठा उत्सव होतो. जेथे अनेक भक्त हनुमानाच्या दर्शनासाठी येतात. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे लोकांना घरात राहूनच हा उत्सव साजरा करावा लागेल. असे असले तरीही लोक सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
हनुमान जयंतीच्या मराठीतून एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही Facebook, WhatsApp Status, Messages चा वापर करु शकता. त्यासाठी तुमच्यासाठी खास शुभेच्छा संदेश
रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
जय जय हनुमान!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
आपल्या शेपूटाने ज्याने जाळली रावणाची लंका
त्याच्या नावाचा आज जगभरात आहे डंका
ज्याची प्रभू श्रीरामांवर होती नितांत भक्ती
अशा बजरंगबलीची आज दाही दिशा घुमू दे किर्ती
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सुता
तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला
बोला जय जय हनुमान
बजरंगबली की जय!
हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून होतो लहान
हृदयी वसतो राम ज्याचा असा भक्त हनुमान
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
हनुमान जयंती दिवशी भक्त हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेतात. हनुमानाला तेलाचा अभिषेक करून रूईची फूलं आणि वडाच्या पानाचा हार अर्पण केला जातो. लोकांनी हनुमानासारखे बलवान आणि चारित्र्यसंपन्न होण्याचा प्रयत्न करावा, हा विचार, संदेश हनुमान जयंती साजरी करण्यामागे असावा.