Haldi Kunku 2022 Rangoli Design: हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाच्या दिवशी काढा या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स
Photo Credit: YouTube Instagram

Haldi Kumkum 2022 Rangoli Design: मकर संक्रांतीच्या वेळेस स्त्रियांच्या हळदी-कुंकवाची गडबड असते. कोणती साडी नेसायची, काय बनवायचं, काय वाण द्यायचे, रांगोळी कशी काढायची इत्यादी सगळे विचार सध्या सगळ्या स्त्रियांच्या मनात कल्ला करत असतील.आम्ही तुमचे काम थोडे सोपे करतो. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रातीमध्ये महिलांच्या हक्काचा समारंभ म्हणजे हळदी कुंकू. या दिवशी महिला खुप नटतात. साज श्रृंगार करतात. या दिवशी महिला अंगणात खुप मोठी रांगोळी ही काढतात. मात्र हल्ली वेळेअभावी आणि जागे अभावी खुप मोठी रांगोळी काढता येत नाही. त्यामुळे छोटी पण सुंदर, आकर्षक रांगोळी आयत्या वेळी काढायला सूचत ही नाही. पण त्याची चिंता करू नका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी काही हटके रांगोळी डिझाईन, आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकूच्या दिवशी दारापुढे काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन....

हळदी कुंकू रांगोळी डिझाइन 

नथ रांगोळी डिझाइन

(हेही वाचा, Latest Rangoli Designs For Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीसाठी रांगोळीच्या हटके डिझाईन)

पैठणी साडी रांगोळी डिझाइन

साडी रांगोळी डिझाइन

हळदी कुंकू रांगोळी

रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचे  रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण भाग आहे. धार्मिक विधी आणि शुभ कार्यात रांगोळीचे खूप महत्व आहे.