Haldi Kunku 2021 Gift Ideas: हळदी कुंकू साठी वाण म्हणून सवाष्णींना द्या घरगुती गोष्टींसह 'या' आरोग्याशी संबंधित उपयोगी वस्तू
Haldi Kunku 2021 Gift Ideas (Photo Credits: Instagram)

Makar Sankranti 2021 Gift Ideas: मकर संक्रांतीचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. आकाशात उंचच उंच उडणा-या पतंगी, हळदी कुंकूवासाठी (Haldi Kunku) साज-शृंगारात नटलेल्या स्त्रिया, लहान मुलांच्या बोरन्हाण चा उत्साह सर्वच गोष्टींमुळे वातावरणात छान उत्साह दिसून येत आहे. अशा वेळी हळदीकुंकूवाचा कार्यक्रम अनेक सवाष्ण स्त्रिया घरात आर्वजून ठेवतात. यावेळी महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू केले जाते. तिळगूळ-लाडू दिला जातो आणि सर्वात महत्त्वाचे वाण (Vaan) दिले जाते. वाण म्हणजे सध्याच्या काळातील शब्द म्हणून आपण भेटवस्तू देखील म्हणू शकतो. वर्षानुवर्षे वाण देणा-या महिलांना दरवर्षी यंदा वाण काय द्यावे हा मोठा गहन प्रश्न पडलेला असतो.

अशा वेळी प्लास्टिकची भांडी, स्टीलची भांडी अशा गोष्टी अनेकदा मिळतात. मात्र यंदा कोरोनाची स्थिती पाहता या वस्तूंसोबत आरोग्याशी संबंधित काही उपयोगी गोष्टी म्हणून थोड्या हटके वाणाच्या आयडियाज

1. मास्क- कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता वाण म्हणून मास्क देणे हा देखील एक उत्तम पर्याय होऊ शकेल.हेदेखील वाचा- Haldi Kunku 2021 Special Ukhane: मकर संक्रांती निमित्त सुवासिनींनी 'हे' सुंदर मराठी उखाणे घेऊन हळदी कुंकू कार्यक्रमाची वाढवा रंगत!

2. सॅनिटायजर- सॅनिटायजर छोट्या-मोठ्या बॉटल्स बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही सामाजिकतेचे भान राखून आरोग्याच्या दृष्टीने हितावह असे सॅनिटायजर देखील देऊ शकता.

3. कापूरदानी- बाजारात वेगवेगळ्या कापूरदानी आल्या आहेत. कापूराचा वास घरात दरवळल्याने घरातील रोगराई दूर होऊन आजारांना घरापासून दूर ठेवतो.

4. कपड्याची पिशवी- प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी तुम्ही वाण म्हणून कपड्याची पिशवी देऊ शकता.हेदेखील वाचा- Haldi Kunku 2021 Rangoli Designs: हळदी कुंकूवाच्या दिवशी दारासमोर काढा कमी वेळात काढून होणाऱ्या  'या' सुंदर , सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स

5. घर साफ करायचे हँड डस्टर- संपूर्ण देशाला वेगवेगळ्या आजारांनी विळखा घातला आहे. अशा वेळी घरातील साफसफाई ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा वेळी बाजारात असे हँडग्लव्हज डस्टर आहेत ज्याने तुम्ही घराची साफसफाई करू शकता. ज्यामुळे तुमच्या हातालाही धूळीचा त्रास होणार नाही.

त्यामुळे यंदा सामाजिकतेचे आणि आरोग्याच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने अख्ख्या घराचा भार पेलणारी महिला म्हणून आपल्यासह इतरांच्या काळजीच्या दृष्टीने अशा पद्धतीने वाण देता येऊ शकतील.