मकर संक्रांती हा सूर्याचे उत्तरायण आणि दान-पुण्य यांचा महापर्व मकर संक्रांत यावर्षी 14 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. नवीन वर्षाचा पहिला सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ कामे सुरू होतात. मकर संक्रांती हिवाळ्याच्या महिन्याच्या समाप्तीचे प्रतीक मानली जाते आणि या सणापासून दिवस मोठा होऊ लागतो. उत्तर भारत, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणा, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात मकर संक्रांती साजरा हा सण साजरा केला जातो.मकर संक्रांती देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते आणि त्याची नावे ही वेगवेगळी असतात. उत्तर भारतात तो लोहारी म्हणून, दक्षिण भारतात पोंगल म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण म्हणून ओळखला जातो. त्याचवेळी गुजरातमधील मकर संक्रांतीच्या वेळी आकाश रंगीबेरंगी पतंगांनी रंगतदार बनते. (Haldi Kunku 2021 Ukhane in Marathi: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये घ्या 'हे' हटके मराठी उखाणे )
महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिन महिला आपल्या घरात तीळ आणि गुळाचे लाडू बनवतात. या दिवशी बऱ्याच महिलांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम ही असतो. या सोहळ्यात स्त्रिया एकमेकांना हळद कुंकू लावून एकमेकांना शुभेच्छा देतात.तसेच या दिवशी घराबाहेरच्या अंगणातील सौंदर्य वाढविण्यासाठी रंगीबेरंगी रांगोळी काढल्या जातात. साधारणत: कोणत्याही विशेष सणात रांगोळी बनविणे खूप शुभ मानले जाते आणि रांगोळीमुळे उत्सवाच्या शुभतेत वाढ होते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत म्हणून काही सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स चे व्हिडिओ ज्याच्या मदतीने तुम्ही ही रांगोळीच्या या डिझाईन्स अगदी सहज बनवू शकता.
पानांची रांगोळी
मंगळसूत्र,नथ रांगोळी डिझाईन
पतंग डिझाईन रांगोळी
पोस्टर रांगोळी
नथ रांगोळी
हळदी कुंकू समारंभात आपण आपल्या घराच्या अंगणात ,कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजासमोर या रांगोळी डिझाईन बनवू शकता. रांगोळी कोणत्याही उत्सवात चारचांद लावते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओमधून बघून या रांगोळी अगदी थोड्या वेळात काढू शकता.