Haldi Kunku 2021 Special Ukhane: मकर संक्रांती निमित्त सुवासिनींनी 'हे' सुंदर मराठी उखाणे घेऊन हळदी कुंकू कार्यक्रमाची वाढवा रंगत!
Haladi Kunku (Photo Credits: File)

Makar Sankranti Ukhane in Marathi: मकर संक्रांती हा सण सुवासिनी बायकांसाठी फार विशेष मानला जातो. मकर संक्रांत (Makar Sankrant) हा वर्षाचा पहिला भारतीय सण असल्याने या सणाला विशेष महत्व असते. या सणादिवशी सुवासिनी बायका सुगड भरतात. एकमेकांना तिळगूळ लाडू देऊन या सणाचा गोडवा वाढवला जातो. या सणानिमित्त सुवासिनींचा हळदी कुंकूवाचा (Haladi Kunku) कार्यक्रम फार विशेष मानला जातो. या दिवशी सुवासिनी बायका छान नटून, साज श्रृंगार करुन घरी हळदी कुंकूवाचा कार्यक्रम ठेवतात. यावेळी सवाशणींना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू लावून तिळगूळ लाडू, वाण, अश्टराचे फूल दिले जात अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. अशा कार्यक्रमात उखाण्यांचा अट्ट्हासही आर्वजून केला जातो.

नवविवाहित मुलींसाठी वा सुवासिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे आपल्या मैत्रिणींसह, परिवारातील अन्य महिलांसाठी एकत्र येऊन आनंद लुटण्याचा कार्यक्रम असतो. त्यामुळे तो उत्साह कायम ठेवण्यासाठी उखाण्यांचा अट्टाहास देखील आर्वजून केला जातो. यावेळी नवविवाहितांसाठी काय उखाणा घ्यायचा असा प्रश्न पडलेला असतो. शिवाय सुवासिनींना देखील पटकन उखाणे आठवत नाही. त्यामुळे हळदी कुंकूवासाठी काही खास उखाणे

1. जमल्या सा-या जणी हळदी कुंकूवाच्या निमित्ताने

संसाराचा गाडा उचलेन .... रावांच्या साथीने

2. तिळाचे लाडू, गुळाचा गोडवा

....रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021 Special Recipes: यंदा मकर संक्रांतीला घरी बनवा तिळाच्या लाडूसह तिळपापडी, तिळवडी सारख्या झटपट रेसिपीज, Watch Videos

3. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी

...रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाच्या वेळी

4. सासर आणि माहेरचे सगळेच आहे हौशी

....रावांचे नाव घेते हळदी कुंकूवाच्या दिवशी

5. मायेने जपली संस्कारात वाढली लेक आहे .....ची (आडनाव टाकणे)

....रावांमुळे सून झाली मी....ची (आडनाव टाकणे)

6. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

.....रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने

7. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले

...चे नाव घ्यायला हळदी कुंकूवादिवशी सर्वांनी अडवले

हेही वाचा- Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा 

8. सर्व दागिन्यांत श्रेष्ठ काळे मनी

...राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी

9. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकूवाचा घातला घाट

आमच्या ... रावांचा आहे एकदम राजेशाही थाट

10. हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,

…रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल

या उखाण्यांनी न केवळ तुमच्या हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाची रंगत वाढेल तर तुमचा दिवसही छान जाईल. खरं पाहायला गेलं तर उखाणा घ्यायला लावलं हा तर एक बहाणा असतो कारण आपल्या पतीराजांचे नाव घेत आपल्या सखीच्या मनाची होणारी घालमेल पाहणे, तिचे लाजणं पाहणे यातही एक वेगळीच गंमत असते.