Tilache Ladu (Photo Credits: YouTube)

Makar Sankranti 2021 Special Recipes: मकर संक्रांत म्हटली की, तिळगूळ लाडू या गोष्टी ओघाओघाने आल्याच. त्याशिवाय संक्रांत पूर्ण होऊ शकत नाही. ज्या सणाच्या शुभेच्छाच 'तिळगूळ द्या, गोड गोड बोला' अशा दिल्या जातात. मग त्यात तिळाचे लाडू बनवणे हा पदार्थ देखील आर्वजून केला जातो. तीळ हा स्निग्ध पदार्थ आणि गूळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीच्या दिवसात तीळाचे लाडू (Til Ladu) खाणे शरीरासाठी खूपच हितवर्धक असते. थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास तिळाची मदत होते. आपापसांतील मतभेद विसरून एकमेकांमधील गोडी वाढविण्यासाठी मकरसंक्रांतीला (Makar Sankranti) तिळगूळ दिले जातात.

तसेच मकर संक्रांतीला सुवासिनी स्त्रिया घरी हळदीकुंकूवाचा (Haladi Kunku) कार्यक्रम ठेवतात. यावेळी त्या आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावू तिळगूळ लाडू देतात. दरवर्षी प्रत्येकाकडे तिळगूळ लाडू आर्वजून केले जातात. मात्र यंदा तुम्ही तिळगूळ लाडूला काही वेगळा पर्याय शोधत असाल तर तिळगूळ लाडूसह पाहा काही हटके रेसिपीज

तिळाचे लाडू

तिळाची पापडी

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा 

तिळाची वडी

तिळाची चिक्की

हेदेखील वाचा- Makar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी? जाणून घ्या तारीख आणि पुजेची शुभ वेळ

घरात खाण्यासाठी तिळाची गूळ पोळी

त्यामुळे यंदा तुम्हाला काही झटपट तिळाच्या रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर तिळाची पापडी, तिळाची वडी हा चांगला पर्याय असू शकतो. मग वाट कसली पाहताय संक्रांतीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय लवकर पाहा या रेसिपीज