Happy Guru Purnima 2023 Wishes: हिंदू संस्कृतीत गुरु पौर्णिमा या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. गुरू पौर्णिमा (Guru Purnima) हा दिवस महर्षी व्यास यांच्या जन्म झाल्याचे मानले जाते ह्यांच्या जन्मदिनानिमित्त गुरू पौर्णिमा हिंदू संस्कृतीत आनंदाने साजरी केला जातो. आपले शिक्षक, गुरू त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो हा खास दिवस असतो. गुरू पौर्णिमाला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्यास ऋतूनी लिहिला.
गुरुपौर्णिमाला गुरुची पूजा केली जाते. भारतात गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. या मंगलदिनी हिंदू संस्कृतीत गुरुला विशेष स्थान दिले जाते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत हा दिन साजरा केला. शाळेत देखील मुलांना गुरु पौर्णिमाचे महत्त्व कळावे याकरिता काही कार्यक्रम आयोजित केले जाते.
1. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
2. गुरुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट..!
3.गुरु जगाची माऊली, सुखाची सुंदर सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
4."गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"
5."गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.
आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
मोठ्या उत्साहात आणि श्रध्दाने हा दिवस साजरा केला जातो. या मंगलदिनी आपल्या गुरू प्रति आदरव्यक्त करण्यासाठी हे मेसेज पाठवा.