Guru Purnima 2020 Images: भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्य साधारण महत्त्व आहे. वर्षभरात 12 किवा 13 पौर्णिमा येतात त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा (Guru Purnima) म्हणतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करण्यासाठी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून गुरुप्रती आदर आणि प्रेमाची भावना नक्की व्यक्त करा. (हेही वाचा - Guru Purnima 2020 Date: यंदा 'या' दिवशी साजरी होणार गुरुपौर्णिमा; जाणून घ्या सणाचे महत्त्व आणि उद्देश)
व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले. त्यामुळे त्यांना आद्यगुरू मानले जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरूंची पूजा केली जाते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते.