
Happy Guru Purnima 2019: आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. या दिवशी आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर आपल्याला मार्ग दाखवणारे अनेक गुरु आपल्या जीवनात येत असतात. आई, वडील तर आहेतच. पण त्याचबरोबर एखादी कला, खेळ, संगीत, नृत्य असे विविध कलागुण शिकवणारे गुरु आपल्या आयुष्यात असतीलच. याच गुरुंप्रती प्रेम, आदर, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेतील शिक्षकांना फुले, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तर शिर्डीत साई उत्सव रंगतो. (शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक)
आपल्या आयुष्यातील गुरुंप्रती प्रेम, आदरं व्यक्त करणाऱ्यासाठी HD Images, Wallpapers, ग्रिटिंग्स WhatsApp Message, Status यासोबतच Facebook Messanger च्या माध्यमातून शेअर करा.





गुरु-शिष्याची यशस्वी परंपरा दाखवणाऱ्या अनेक जोड्या आपल्या समोर आहेत. तर त्यांचा आदर्श घेत आपणही यंदाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंकडून नवं काहीतरी शिकण्याची प्रेरणा घेऊया आणि स्वतःला अधिक समृद्ध करुया.