Gudi Padwa 2024 Rangoli Designs: गुढीपाडव्याला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
Gudi Padwa | (Photo Credits: Twitter/ANI)

Gudi Padwa 2024 Rangoli Designs:चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र, गोवा आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते, शेतकरी नवीन पीक लावण्यासाठी हा दिवस कापणीचा दिवस म्हणून साजरा करतात. यासोबतच या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. या दिवसाशी संबंधित पौराणिक मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसापासून सत्ययुग सुरू झाला. गुढी म्हणजे विजयाची पताका आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी, म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेला लोक विजयाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी सजवतात. या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे म्हणतात.

पाहा, गुढी पाडव्याला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गुढीपाडव्याला गुढी सजवण्याबरोबरच लोक त्यांच्या घराच्या गेटवर आंब्याचा किंवा अशोकाच्या पानांचा सजवतात आणि हा सण आनंदात साजरा केला जातो.