Oskar Sala Google Doodle Today: जर्मन इलेक्ट्रॉनिक संगीत प्रवर्तक ऑस्कर साला 112 वी जयंती निमित्त खास गूगल डूडल, तुम्ही पाहलेत का?
Oskar Sala Google Doodle | (Photo Credit: Google)

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन अशी ओळख असलेले गूगल (Google ) हे आपल्या होमपेजवर दररोज काही ना काही हटके दाखवत असते. यात प्रामुख्याने वेगवेगळे सण, उत्सव आणि व्यक्तीमत्वांचा समावेश असतो. आजही गूगलने असेच हटके डूडल बनवले आहे. आजचे गूगल डूडल (Google Doodle) 20 व्या शतकातील प्रसिद्ध जर्मन संगीतकार, भौतिकशास्त्रज्ञ आणि इलेक्ट्रॉनिक संगितातील अग्रणी ऑस्कर साला ( Oskar Sala) यांच्यावर आधारीत आहे. ऑस्कर साला यांना मिश्रण-ट्रौटोनियम नावाच्या संगीत उपकरणावर आवाज निर्माण करण्यासाठी ओळखले जाते.

Oskar Sala यांचा जन्म 19710 मध्ये जर्मनीतील ग्रीज येथे झाला. साला यांच्या आई एक उत्तम गायिका होत्या. त्यांचे वडीलही संगीत क्षेत्रातील एक प्रतिभावान व्यक्तीमत्व होते. त्यासोबतच ते डोळ्यांचे डॉक्टरही होते. वयाच्या 14 व्या वर्षीच ऑस्कर साला यांनी वॉलियन आणि पियानो यांसारख्या संगीत वाद्यांशी दोस्ती केली. पुढे त्यांनी अनेक गाणी आणि सांगितीक रचनाही केल्या.

ऑस्कर सला यांनी जेव्हा पहिल्यांदा ट्रॅटोनियम नावाच्या उपकरण ऐकले आणि पाहिले तेव्हा ते त्याचे तंत्रज्ञान पाहून भाराऊन गेले. त्यानंतर त्यांनी ट्रॅटोनियममध्ये कौशल्य मिळवले. हेच उपकरण त्यांनी पुढे अधिक विकसीत केले. त्यांनी या उपकरणात केलेला विकास हा संगीत क्षेत्राला एक नवी उर्जा देऊन गेला.

ऑस्कर सला यांनी अनेक टीव्ही मालिका, रेडिओ, चित्रप आणि इतर काही निर्माता कंपन्यांना संगीत दिले. अनेक गाणी आणि संगितरचना केल्या. रोजमेरी (1959) आणि द बर्ड्स (1962) यांसारख्या कलाकृतींतून त्यांनी पक्षांचे विविध आवाज. खास करुन चिमनीच्या रडण्याचे आवाज, हातोड्याचे आवाज, खिडकी आपटताना येतो तसा आवाज निर्माण केले.

ऑस्कर यांना आपल्या एकूण आयुष्यामध्ये विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्यामुळे अनेक संस्थांनाही पुरस्कार मिळाले. 1995 मध्ये त्यांनी आपले ओरिजनल मिश्रण-ट्रौटोनियम एका जर्मन संग्रहालयाला दान केले.