
Happy Teacher's Day 2022 Messages: एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाला किंवा भविष्याला योग्य वळण देण्यात गुरूचा मोठा वाटा असतो. माणसाला जीवनाचा योग्य मार्ग निवडण्याची समज फक्त गुरुचं देऊ शकतो. यशाच्या पायऱ्या गाठण्याचा हा एकमेव मार्ग आहे. यामुळेचं आपल्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो आणि त्यांना पालकांपेक्षा वरचा दर्जा दिला जातो. गुरूचे महत्त्व दर्शविण्यासाठी भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा विशेष दिवस शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
शिक्षक दिनानिमित्त तुम्ही Wishes, Images, Greetings, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या गुरुजनांना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Teacher's Day 2022: शिक्षक दिन कधी आहे? हा दिवस का साजरा केला जातो? त्यामागचा इतिहास काय आहे? वाचा सविस्तर)
2G, 3G, 4G,
5G, 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG,
शिवाय पर्याय नाही..
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!

योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,
खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,
जेव्हा काहीच कळत नाही,
तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..
आयुष्यातील प्रत्येक अंधारात
प्रकाश दाखवता तुम्ही..
हॅपी टीचर्स डे..!

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी टीचर डे सर..!

माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपणा पासून ते आज पर्यंतचे सर्व मित्रपरिवार,
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेल्या,
अशा सर्व शिक्षकांना शतशा वंदन.
आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचे मार्गदर्शक होण्यासाठी,
आम्हाला प्रेरित करण्यासाठी,
आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,
आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,
तुमचे खूप खूप धन्यवाद…
हॅपी टीचर्स डे..!

5 सप्टेंबर..
माजी. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,
यांच्या जन्मदिवसा निमित्त,
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
शिक्षक दिवस निमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा..!
सर्व शिक्षक गुरूजनांना नमन

भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते.