Father's Day 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

Father's Day 2025 HD Images: फादर्स डे (Father's Day 2025) हा जगभरात साजरा केला जाणारा एक खास दिवस आहे जो वडिलांच्या प्रेमाचा, पाठिंब्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. प्रत्येकाच्या आयुष्यात, वडील ही अशी व्यक्ती असते जी सर्वात जास्त महत्त्वाची असते. दरवर्षी अमेरिका, युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि भारत अशा अनेक देशांमध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस 15 जून म्हणजेचं आजा साजरा होत आहे. दरवर्षी फादर्स डेची तारीख बदलते.

फादर्स डे हा महत्त्वाचा दिवस शक्यतो 15 ते 21 जून दरम्यान येतो. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या वडिलांना Wishes, Greetings, Messages, Whatsapp Status द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा देऊन फादर्स डेच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Father's Day 2025: उद्या जगभरात साजरा होणार 'फादर्स डे'; जाणून घ्या या दिवसाचा इतिहास, अर्थ आणि काही रंजक तथ्ये)

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)
Happy Fathers Day (Photo Credits-File Image)
Father's Day 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)
Father's Day 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)
Father's Day 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)
Happy Fathers Day (Photo Credits-File Image)
Happy Fathers Day (Photo Credits-File Image)
Happy Fathers Day (Photo Credits-File Image)
Happy Fathers Day 3 (Photo Credits-File Image)

फादर्स डेची कल्पना 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत आली. हा दिवस वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथील सोनोरा स्मार्ट डोड यांच्याकडून साजरा करण्यात आला. तिला तिचे वडील विल्यम जॅक्सन स्मार्ट यांच्या सन्मानार्थ एक दिवस हवा होता, कारण त्यांनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकट्याने 6 मुलांना वाढवले. म्हणूनच, सोनोराने ठरवले की, वडील कौतुकास पात्र आहेत. त्यानंतर तिने फादर्स डेची कल्पना सुचली. पहिला फादर्स डे 1910 मध्ये साजरा करण्यात आला, परंतु तो अधिकृतपणे साजरा होण्यास अनेक वर्षे लागली.