Father's Day 2023 Quotes in Marathi: वडिलांचे मुलांशी असलेले नाते सर्वात खास असते. मुलाला पहिलं पाऊल टाकायला शिकवण्यापासून ते आयुष्यभर प्रत्येक पावलावर बाप त्याच्या पाठीशी उभा असतो. मुलं चांगली वागतात तेव्हा वडील त्यांची स्तुती करतात आणि वाईट वागल्याबद्दल त्यांना फटकारतात. जीवनात पुढे जाण्याचा मार्गही वडिलचं मुलाला दाखवतात. वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृदिन (Father's Day 2023) साजरा केला जातो.
फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 18 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामुळे हा दिवस खास बनवण्यासाठी आम्ही या दिवशी वडिलांना खास शुभेच्छा देण्यासाठी काही Wishes, Greetings, Images, Whatsapp Status, SMS घेऊन आलो आहोत. खालील ईमेज सोशल मीडियाद्वारे पाठवून तुम्ही आपल्या बाबांना खास पितृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Father's Day 2023 Songs: खास फादर्स डे निमित्त वडिलांप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी बाॅलिवूडमधील गाणी)
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
आणि तुम्ही माझे वडील आहात
हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे...
माझ्या प्रिय वडिलांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्य जगण्याची खरी मजा तर
वडिलांकडून मागितलेल्या एक रुपयात होती
आमच्या कमाईत तर आवश्यकता देखील पूर्ण होत नाही..!
हॅप्पी फादर्स डे पप्पा!
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.
Happy Fathers Day!
आनंदाने भरलेला प्रत्येक क्षण असतो
आयुष्यात सोनेरी प्रत्येक दिवस असतो
मिळते प्रत्येक कार्यात यश त्यांना
ज्यांच्या सोबत बाबा प्रत्येक क्षण असतो
बाबांना पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संध्याकाळच्या जेवणाची
चिंता करते ती “आई”
आणि आयुष्यभराच्या जेवणाची
चिंता करतात ते “बाबा”
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या संकटांवर
निधड्या छातीने मात करणाऱ्या शक्तीस
बाप म्हणतात
आपल्या भवितव्यासाठी
कष्टाशी चार हात करणार्या शक्तीस
बाप म्हणतात
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
वडील आणि मुलांमधील नाते हे स्नेहाचे तसेच जबाबदारी, संरक्षण आणि काळजीचे असते. आई मुलाला 9 महिने आपल्या पोटात ठेवते आणि वडील स्वतंत्र होईपर्यंत बाळाची काळजी घेतात. प्रत्येक वडिलांचे आपल्या मुलावर प्रेम असते पण त्याचे भविष्य घडवण्यासाठी आणि त्याला एक आदर्श जीवन देण्यासाठी वेळुप्रसंगी ते कठोरपणा दाखवतात. वडिलांना त्याग आणि समर्पणाचे उदाहरण म्हणता येईल. अनेक मुलांसाठी त्यांचे वडील सुपरहिरो असतात.