
Vat Purnima 2023 Messages: वट सावित्री पौर्णिमा व्रत हा महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात इत्यादी देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. उत्तर भारतात भाविक ज्येष्ठ अमावस्येला उपवास करतात, तर दक्षिण भारतात लोक ज्येष्ठ पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. वट सावित्री व्रतामध्ये विवाहित स्त्रिया उपवासासह वट सावित्री व्रताची कथा ऐकतात. त्यानंतर त्या वटवृक्षाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. यावेळी वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग तयार होत आहेत. वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळ आणि दुपारचे शुभ मुहूर्त असतात.
यावर्षी 3 जून रोजी वट सावित्री पौर्णिमेचे व्रत पाळले जाणार आहे. वट पौर्णिमानिमित्त Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे तुम्ही सुवासिनींना खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Vat Purnima 2023 Date and Time: वट पौर्णिमा कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या)
वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यासारखा जोडीदार सापडायला भाग्य लागतं..
तुला भेटले आणि स्वतःशीच नव्याने ओळख झाली..
तुझ्यासोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले..
ह्याच जन्मी काय, पुढच्या साता जन्मात मला,
तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस..
वटपौर्णिमेच्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा..!

ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन सर्वोच्च देवतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वटवृक्षाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात. असं म्हटलं जात की, हे व्रत पाळल्याने पतीला दिर्घआयुष्य लाभतं.