Happy Constitution Day 2023 HD Images: भारतीय संविधान दिनानिमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings द्वारे द्या खास शुभेच्छा!
Happy Constitution Day (PC - File Image)

Happy Constitution Day 2023 HD Images: 26 जानेवारी रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन (Indian Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या विकासाचा प्रवास खूप मोठा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण राज्यघटना लागू करण्यात आली परंतु भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाले. 26 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारने प्रथमच संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा केला.

तथापी, 26 नोव्हेंबर 2015 पासून दरवर्षी संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा केला जात आहे. पूर्वी हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस खास आहे. त्यामुळे लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील भारतीय संविधान दिनानिमित्त Quotes, WhatsApp Status, Messages, Greetings शेअर करून खास मराठी शुभेच्छापत्र पाठवू शकता. (हेही वाचा - Dev Deepawali 2023 Date: देव दिवाळी कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व)

Happy Constitution Day (PC - File Image)
Happy Constitution Day (PC - File Image)
Happy Constitution Day (PC - File Image)
Happy Constitution Day (PC - File Image)
Happy Constitution Day (PC - File Image)

संविधान दिनाचे मुख्य उद्दिष्ट भारतातील नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि संवैधानिक मूल्यांचा प्रचार करणे हा आहे. 2015 मध्ये, 26 नोव्हेंबर रोजी, संविधानाचे शिल्पकार, डॉ. आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अधिसूचित केला होता. संविधानिक मूल्यांप्रती नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.