
Gandhi Jayanti 2023 Wishes In Marathi: दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती (Gandhi Jayanti 2023) साजरी केली जाते. या दिवशी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा जन्म झाला होता. देशभरात मोठ्या उत्साहात गांधी जयंती साजरी केली जाते. गांधीजींना लोक प्रेमाने बापू म्हणतात. इतिहासकारांच्या मते गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्तता मिळाली.
गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई होते. 2 ऑक्टोबरला देशभरात गांधी जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. यानिमित्ताने लोक एकमेकांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Messages, Quotes, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास गांधी जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
रघुपती राघव राजाराम
पतित पावन सीताराम
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता
याची शिकवण देणाऱ्या
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना
विनम्र अभिवादन!
महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्य, अहिंसा, बंधुता
स्मरो तुम्हा नित वंदिता
गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याचा प्रत्येक दिवस
हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका की तुम्ही
अमर राहणार आहात”
– महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती
निमित्त विनम्र अभिवादन!

महात्मा गांधी हे भारताचे ते महान योद्धे होते. त्यांनी लोकांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. तसेच सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण करून, गांधी जयंती दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरी केली जाते.