Ganeshotsav 2019: प्रथम तुला वंदितो ते मोरया मोरया पर्यंत ही 10 मराठमोळी गाणी दरवर्षी ठरतात गणेशोत्सवाची शान (Watch Video)
Ganesha Representative Image (Photo Credits: PixaBay)

Ganpati Special Marathi Songs: आज 2 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंद उल्हासाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी बाप्पांची दीड, पाच, सात दिवसांसाठी प्रतिष्ठापना होणार आहे. मुंबईत तर या सणाचे इतके क्रेझ आहे की अगदी गल्लोगल्ली बाप्पांची मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक मंडळाची वेगळी मूर्ती, वेगळी आरास, वेगळी मिरवणूक यामुळे एकाच ठिकाणी वैविध्यतेचे दर्शन घडते. पण या सर्वच मंडळांमधील एक समान गोष्ट म्हणजे गणेशोत्सव काळात मंडपाच्या परिसरात वाजवण्यात येणारी गाणी. कित्येक वर्षांपासून काही पारंपरिक भक्तिगीते बाप्पाच्या दरबारी लावली जातात, आणि आता तर या गाण्यांची इतकी चर्चा असती की अमुक एक गाणं लागलं नाही तर गणपती आले असे वाटतच नाही असेही भक्त सांगतात.

चला तर मग आज गणरायाच्या आगमनाच्या दिवशी ही पारंपरिक मराठमोळी गाणी कोणती हे पाहून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाची नांदी करूयात..

प्रथम तुला वंदितो

गणपती माझा नाचत आला

सनईचा सूर

मोरया मोरया

अशी चिक मोत्याची माळ

गणराज रंगी नाचतो

(Ganesh Chaturthi 2019 Special Ukdiche Modak: गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक घरच्या घरी झटपट कसे बनवाल? (Watch Video)

एकदंताय वक्रतुंडाय

गजानना श्री गणराया

ग गणपती चा.. म महादेवाचा

अष्टविनायका तुझा महिमा कसा

दरम्यान मुंबई महापालिकेने काढलेल्या नियमानुसार यंदा ध्वनी  प्रदूषण टाळण्याकरिता गणेश मंडपात केवळ भक्तिगीते लावण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे. या गाण्यांमुळे वातावरणात सकारात्मकता पसरण्यास मदत होते शिवाय धांगडधिंगा टाळल्याने सणाला गालबोट लागत नाही.