Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)

Ganesh Visarjan 2020 HD Images: आज अखेर आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली असून सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) साजरी करण्यात येणार आहे. गेल्या 10 दिवसांपासून बाप्पाची मनोभावे केलली पूजा आणि आरती या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळाच  आनंद असतो. परंतु आता निरोपाची वेळ आली की आपले डोळे पाणावले जातात. असो पण गणपती बाप्पा नेहमीच आपल्या सोबत रहावा यासाठी आपण त्याची प्रार्थना करतो. तर गणेशोत्सवाचा सण यंदा जरी धुमधडाक्यात साजरा करता आला नाही तरीही घरच्या घरी सुद्धा नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तो उत्साहात साजरा केल्याचे दिसून आले आहे.

गणेशविसर्जनाची सुद्धा आगमनाप्रमाणेच मोठी धुम सर्वत्र दिसून येते. मात्र यंदा कोरोनामुळे ही धुम दिसून येणार नसल्याने काही जण घरच्या घरीच किंवा कृत्रिम तलावात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करणार आहेत. तर यंदाच्या  अनंत चतुर्दशीच्या निमित्त मराठमोळे मेसेज, WhatsApp Status, Images शेअर करुन द्या गणरायाला निरोप! (Ganesh Visarjan 2020 Message: गणपती विसर्जन निमित्त मराठमोळी WhatsApp Stickers, Quotes, Images शेअर करून मंगलमय करा गणेशोत्सवातील शेवटचा दिवस)

Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)
Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)
Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)
Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)
Ganesh Visarjan 2020 (Photo Credits-File Image)

दरम्यान, यंदा गणेशोत्सवानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी रक्त दान शिबीर, प्लाझ्मा दान यासारखे सामाजिक उपक्रम राबवण्यात आल्याचे दिसून आले आहे. तर कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता सरकारने गणेशोत्सव मंडळांना ही गणरायाची मुर्ती 4 फुटांपर्यंत असावी असे स्पष्ट केले होते. त्याचसोबत नियम आणि अटींची सुद्धा पुर्तता करण्यासंबंधित एक मार्गदर्शक नियमावली ही जाहीर केली होती. असो पण आता बाप्पा आपल्या गावाला चालले असून त्याचा आशीर्वाद नेहमीच सदैव आपल्या आणि कुटुबांच्या पाठीशी असावा अशी आजच्या दिनी प्रार्थना करुयात. तुम्हा सर्वांना लेस्टेली मराठी कडून अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!