माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) हा गणेश भक्तांसाठी वर्षभरातील एक महत्त्वाचा दिवस आहे. यंदा ही गणेश जयंती 25 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव याच गणेश जयंतीपासून साजरा केला जातो. मग बाप्पाच्या भक्तांना या माघी गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडीयात तुम्ही ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, WhatsApp Messages, Status शेअर करत हा दिवस साजरा करू शकता. माघी गणेश जयंती निमित्त सारी गणेश मंदिरं सजलेली असतात. मग तेच मंगलमय वातावरण तुम्ही सोशल मीडीयामध्येही हे खास मेसेज शेअर करत निर्माण करत तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना शुभेच्छा देऊ शकता.
माघी गणेश जयंती निमित्त घराघरात बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य केला जातो. या निमित्ताने तीळापासूनही मोदक बनवण्याची रीत पाळली जाते. तिलकुंद चतुर्थीला तीळाचा वापर करून गोडाचा पदार्थ बनवला जातो. मग आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी घरी बनवलेल्या गोडा-धोडाच्या पदार्थांवरही ताव मारायला विसरू नका. Maghi Ganpati 2023 Invitation Card Format in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी Messages, HD Images!
गणेश जयंतीच्या शुभेच्छा
येऊ दे जीवनात कितीही मोठं संकट, समस्या
नाही सोडणार तो कधी आपली साथ
अशा गणरायाला जोडूनी दोन्ही हात
नमन करू सारे आज
माघी गणेशोत्सवाच्या गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा
माघी गणेश जयंतीच्या सार्या गणेश भक्तांना शुभेच्छा,
हा मंगलमय दिवस तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी
घेऊन येवो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना !
माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
फुलांचा आरंभ होतो कळीने
आयुष्याचा आरंभ होता प्रेमाने
प्रेमाची सुरूवात होते तुझ्या नावाने
अणि भक्तीचा आरंभ होतो तुझ्या कृपेने
गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा!
माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ
निविघ्न कुरमे देव सर्व कार्येषु सर्वदा
गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा एक सुपुत्र म्हणजे गणपती. हिंदू धर्मीय गणरायाला गणांचा अधिपती म्हणून संबोधतात. त्यामुळे चांगल्या कामाची सुरूवात, शुभकार्याला प्रारंभ हा गणपती बाप्पाची पूजा करूनच केला जातो. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता समजून त्याची पूजा केली जात असल्याने बाप्पाच्या भाविकांमध्ये त्याला श्रद्धेचं विशेष स्थान आहे.