Maghi Ganpati 2023 Invitation Card Format in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी Messages, HD Images!

हिंदू पुरण कथांनुसार, गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला आहे. यंदा ही जयंती 25 जानेवारीला आहे.

Maghi Ganpati 2023 Invitation Card Format in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी Messages, HD Images!
Ganapati | Pixabay.com

गणेशभक्तांसाठी माघी गणेश जयंतीचा (Maghi Ganesh Jayanti) दिवस हा खास असतो. हिंदू पुरण कथांनुसार, गणपती बाप्पाचा जन्म हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला आहे. दरम्यान ही चतुर्थी तिलकुंद चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. यंदा माघी गणेश जयंती 25 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. या चतुर्थीच्या निमित्ताने काही गणेशभक्त घरात गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापित करून त्याची पूजा अर्चना करतात. मग यंदा तुमच्या घरी देखील गणरायाचं आगमन होणार असेल तर बाप्पाच्या दर्शनाला तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना आमंत्रित करून हा दिवस त्यांच्यासोबत साजरा करण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका शेअर करू शकता. WhatsApp Message किंवा SMS यासोबतच इतर सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर ही आमंत्रण शेअर करून तुम्ही त्यांना घरी आमंत्रित करू शकता.

माघी गणेश जयंती निमित्त यंदा पुन्हा कोविड पूर्व काळाप्रमाणे गणेशभक्त हा दिवस साजरा करणार आहेत. आता निर्बंध पूर्णपणे हटवले गेले असल्याने पुन्हा पहिल्याप्रमाणे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही नातेवाईक, मित्रमंडळींच्या घरी जाऊ शकता. (हे ही वाचा:- Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipes: माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बानवाल?)

माघी गणेश जयंती निमंत्रण पत्रिका

श्री गणेशाय नम:

सालाबादा प्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणपतीचं आगमन होणार आहे. या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर हजेरी लावावी.

आपले लाडके,

पत्ता:

गणेश जयंती आमंत्रण । File Image

माघी गणेश जयंती निमित्त आमच्या घरी गणराया विराजमान होणार आहे. 25 जानेवारी दिवशी बाप्पाच्या दर्शनाला आणि सत्यनारायणाच्या पूजेला हजेरी लावून प्रसादाचा लाभ घ्यावा.

विनित,

श्री गणेश हा सुखकर्ता, विघ्नहर्ता म्हणून ओळखला जात असल्याने कोणत्याही शुभ प्रसंगी पहिल्यांदा गणरायाची पूजा करण्याची हिंदू धर्मियांची रीत आहे. त्यामुळे माघी गणेशोत्सवामध्येही गणेश जयंती साजरी करताना त्यांच्यामध्ये मोठा उत्साह असतो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे हा माघी गणेशोत्सव देखील साजरा होतो.

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2023 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).