Wadala GSB Ganeshotsav Mandal (Photo Credits: Instagram)

आपल्या देशात बरीच भागात अनेक देवतांची पूजा केली जाते, जसे कोलकातामध्ये दुर्गा आणि बिहारमधील छठ पूजा, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही गणेश पूजा विशेष आहे. गणपतीला (Ganapati) विघ्नहर्ता आणि प्रथम उपासना करणारा देव म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रांतांमध्ये गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणून साजरे केले जाते आणि 10 दिवसांपर्यंत त्यांची पूजा केली जाते. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) ऑगस्ट महिन्यात साजरा केला जाईल.  यावर्षी शनिवारी, 22 ऑगस्ट 2020 रोजी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. महाराष्ट्रात (Maharashtra) गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उत्सवात मोठा फरक दिसणार आहे. करोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन आगामी सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्लेगच्या साथीमुळे शंभर वर्षांपूर्वी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. (Ganeshotsav 2020: यंदा भाद्रपदात गणेशोत्सव होणार नाही! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडाळा GSB सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा मोठा निर्णय)

भारतीय संस्कृतीत, गणेशाला ज्ञान प्रदाता, विघ्न-विनाशक, मंगलकारी, रक्षाकारक, सिद्धिदायक, समृद्धि, सामर्थ्य आणि सन्मान प्रदान करणारा मानला जाते. गणेशोत्वा दरम्यान गणेशाचे भव्य पद्धतीने सजावट करून त्यांची पूजा केली जाते आणि शेवटच्या दिवशी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरांत विसर्जन केले जाते. मुंबई, पुणेसह अनेक गणेश मंडळांनी अत्याधिक साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे पाच गणपती तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी मंडळ या प्रमुख गणपती मंडळांनी ऑनलाइन बैठक घेऊन आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला.

उत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. दुसरीकडे, मुंबईच्या प्रसिद्ध जीएसबी मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी म्हणून जीएसबी गणेशोत्सव मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.