भारताचे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी (Mohandas Karamchand Gandhi) यांची आज (2 ऑक्टोबर) 155 वी जयंती आहे. या निमित्ताने महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) स्मृतीला वंदन करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सत्य, अहिंसा या जीवनमूल्य जगाला देणार्या गांधींजींच्या स्मृतीला राजघाटावर आदरांजली अर्पण केली जाते. मग बापूजींप्रति तुम्हीदेखील आदर व्यक्त करत गांधी जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp, Instagram, Facebook, X द्वारा शेअर करत या दिवसाला थोडं बनवू शकता. Messages, Wishes, Greetings, HD Images तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना देऊन या दिवशी गांधींजींनी दिलेल्या मूल्यांचं स्मरण करा. आजचा 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही पाळला जातो.
मोहनदास करमचंद गांधी हे बॅरिस्टर होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरले. अहिंसेच्या मार्गाने लढा उभारत महात्मा गांधीजींनी भारताची ब्रिटीशांच्या पारतंत्र्यातून सुटका केली.
गांधी जयंतीच्या शुभेच्छा
महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मध्ये पोरबंदरला झाला. 1869 साली जन्मलेले महात्मा गांधी गुजरात मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढे लंडन आणि दक्षिण आफ्रिकेला गेले. मात्र मातृभूमीला पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला.