राज्यभरात आज गणपती विसर्जन केले जात आहे. विविध ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरुवातही झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी मिरवणूकसोबत वरुनराजानेही हजेरी लावली आहे. गेले काही दिवस राज्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. तसाच पाऊस आजही कोसळू लागल्याने गणेशभक्तांची काही ठिकाणी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
Ganapati Visarjan 2019 Live Updates: मुंबई, पुणे, नागपूर शहरांसह महाराष्ट्रभरातील गणपती विसर्जन क्षणाक्षणांच्या बातम्या
Ganapati Visarjan 2019 Live Updates: आज अनंत चतुर्दशी. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सवातील गणपती विसरर्जनाचा दिवस. महाराष्ट्रात तर गणपती विसर्जन मिरवणुकीस अनेक ठिकाणी सुरुवात झाली देखील. मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक शहरांसह महाराष्ट्रभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे आज विसर्जन होत आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश भक्तांची उसळणारी गर्दी आणि त्याचा वाहतुक यंत्रणा आणि कायदा व सुव्यवस्थेवर पडणारा ताण ध्यानात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, पोलिसांनी अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. खास करुन मुंबई शहरातील लालबागचा राजा, गणेश गल्ली गणपती यांसह पुणे शहरातील मानाचे पास गणपती विसर्जन मिरवणूकीच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष फौजफाटा तैनात केला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना राज्यभरातील गणपती विसर्जन मिरवणूक आणि उत्साहाच्या ताज्या बातम्या, क्षणाक्षणांची माहिती मिळविण्यासाठी तुम्ही नजर ठेवा लेटेस्टली मराठीच्या https://marathi.latestly.com/ या संकेतस्थळावर.