Happy Father’s Day | File Photo

Happy Father's Day 2022 Messages: आईच्या पायात स्वर्ग असतो असं म्हणतात, पण प्रत्येक मुलाचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे 'बाप.' त्याच्या भावना अनेकदा दडलेल्या राहतात. बापाचा हात डोक्यावरच्या छतासारखा असतो. बाप असेल तर प्रत्येक हट्ट पूर्ण होतो. वडील अनेकदा बोलून त्यांचे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत, परंतु त्यांचं रागावणं जीवनाचा धडा शिकून जातं. या सर्व बाबींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father's Day) साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. जर तुम्हालाही तुमच्या वडिलांचे आभार मानायचे असतील तर तुम्ही या दिवशी आपल्या बाबांना काही खास मेसेज पाठवू शकता.

बहुतेक देशांमध्ये फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यामागे एक कथा आहे. असं म्हटलं जातं की, एका मुलींने तिच्या मृत वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला. त्यानंतर 1972 पासून दरवर्षी अमेरिकेत जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला. तुम्ही फादर्स डे च्या निमित्ताने तुमच्या वडिलांना काही प्रेमळ संदेश पाठवून त्यांचा दिवस खास बनवू शकता. फादर्स डे निमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून आपल्या बाबांना खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - How To Make Father’s Day 2022 Greeting Cards?तुमच्या प्रिय वडिलांसाठी खास कार्ड तयार करण्यासाठी काही DIY कल्पना आणि ट्यूटोरियल, पाहा व्हिडीओ)

ज्यांनी माझं Status निर्माण केलं

त्या वडिलांना या Status मधून हजार वेळा दंडवत!

हॅप्पी फादर्स डे!

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

आकाशालाही लाजवेल अशी उंची आणि आभाळालाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे 'बाबा'

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

आयुष्यभर कष्ट करून

जो कायम देतो सदिच्छा

त्या बाबाला समजून घेऊन

पूर्ण करावी त्याची माफक इच्छा

हॅप्पी फादर्स डे!

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

आपले दु:ख मनात ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे 'वडील'

Happy Father's Day!

Happy Fathers Day (Photo Credits-File Image)

ठेच लागली की आई आठवते

पण मोठं संकट आलं की

बापच आठवतो!

आयुष्यातील या बापमाणसाला

हॅप्पी फादर्स डे!

Happy Father's Day Marathi Messages (Photo Credits: File Image)

आयुष्यात वडिलांचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. जिथे आई आपल्याला प्रेम आणि आपुलकी देते, तिथे वडील जीवनाचा भक्कम पाया घालतात. यामुळेच दरवर्षी जून महिन्यात फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे साजरा करण्यामागचा इतिहास अनेक वर्षांचा आहे.