International Nurses Day 2024 Messages: कोरोनाच्या काळात, जेव्हा जगभरातील लोक संसर्गामुळे त्रस्त होते, तेव्हा डॉक्टरांबरोबरच परिचारिकांची भूमिका खूप महत्त्वाची बनली होती. कोविड संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धा बनले आणि त्यांनी या विषाणूपासून आमचे संरक्षण केले. डॉक्टरांसह परिचारिकांनी रात्रंदिवस जनतेची सेवा केली. कोणत्याही रुग्णाच्या आरोग्य सेवेमध्ये डॉक्टरची जितकी महत्त्वाची भूमिका असते, तितकीच महत्त्वाची भूमिका नर्सची असते. नर्स आजारी व्यक्तींची काळजी घेते.
डॉक्टर दिवसभर रुग्णासोबत राहू शकत नाही. नर्स रुग्णाची सेवा करते. परिचारिकांच्या या सेवाभावाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. दरवर्षी परिचारिका दिन (International Nurses Day 2024) 12 मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त WhatsApp Status, HD Wallpapers, Images शेअर करून तुम्ही नर्सेसबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकता.
परिचारिका हा केवळ एक व्यवसाय नाही,
ते प्रेम, समर्पण आणि वचनबद्धता आहे.
परिचारिका दिनानिमित्त सर्व नर्संना हार्दिक शुभेच्छा!
मानवाच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या क्षणांचा साक्षीदार म्हणजे नर्स
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सर्व नर्सना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
स्वत: ला ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्यांच्या सेवेत स्वत:ला झोकून देणे
परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्यासारख्या परिचारिकांमुळे
जग एक चांगले ठिकाण आहे
उपचारासाठी तुमची अटूट बांधिलकी खरोखरच उल्लेखनीय आहे.
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जानेवारी 1974 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मात्र, नंतर मे महिन्यात परिचारिका दिन साजरा केला जाऊ लागला. परिचारिका दिन आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना समर्पित आहे. म्हणून हा दिवस 12 मे रोजी साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म 12 मे रोजी झाला. त्यांनीच नोबेल नर्सिंग सेवा सुरू केली. आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.