रमजान (Ramadan) महिन्याची सांगता मुस्लिम बांधव रमजान ईद साजरी करत करतात. यंदा 11 एप्रिल दिवशी रमजान ईद (Ramadan Eid) आहे. त्यामुळे आज देशभरातील मुस्लिम बांधव रमजान ईदच्या शुभेच्छा एकमेकांना गळाभेट देत देणार आहेत. या निमित्ताने घरात बिर्याणी पासून शीर कुर्मा सारख्या पदार्थांची रेलचेल असते. रमजान ईद ला ईद-उल-फितर म्हणून देखील ओळखलं जातं. मग मुस्लिम बांधवांसाठी आनंदपर्व असलेल्या या रमजान ईदच्या शुभेछा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. यासाठी ईदच्या शुभेच्छा देणारी WhatsApp Status, Facebook Messages, Greetings शेअर करून हा दिवस अजून खास करू शकाल.
रमजान ईदच्या दिवशी मशिदींमध्ये नमाज अदा करत मुस्लिम बांधव अल्लाह कडे प्रार्थना करत आभार व्यक्त करतात. 'ईदी'च्या स्वरूपात लहान मुलांना पैसे किंवा भेटवस्तू मिळते त्यामुळे त्यांना देखील या रमजान ईदची विशेष उत्सुकता असते. इस्लामिक कॅलेंडरनुसार, वर्षाचा नववा महिना रमजानचा महिना आहे जो अतिशय पवित्र महिना मानला जातो. हा संपूर्ण महिना मुस्लिम उपवास ठेवतात आणि अल्लाहची उपासना करण्यात वेळ घालवतात. रमजानच्या सुरुवातीपासूनच भारतासह जगभरात ईदची तयारी सुरू होते. शव्वालचा अर्ध चंद्र दिसल्यानंतरच ईद कधी साजरी करायची हे ठरते. Ramzan Eid 2024 Mehndi Designs: ईद सणाला काढता येतील अशा सुंदर मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ .
ईद मुबारक
00 ईदच्या निमित्ताने घराघरात सेलिब्रेशन केलं जातं तसेच हे सेलिब्रेशन गरजू व्यक्तींना दान देऊन देखील केलं जातं.