
Milad Un Nabi Mubarak Wishes: मुस्लिम बांधवासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला 'ईद-ए-मिलाद उन नबी' (Eid-E-Milad-Un-Nabi) चा सण येत्या 30 ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचा आनंद म्हणून 'ईद-ए-मिलाव-अल-नबी' चा सण साजरा केला जातो. 'ईद-ए-मिलाद' (Eid-e-Milad) ला 'मिलाद-उन-नबी' (Milad-Un-Nabi)आणि 'मावलिद-ए-नबी' (Mawlid-e-Nabi) इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. मुस्लिम समाजात हा दिवस पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. ऐतिहासिक तथ्यांनुसार, पैगंबर मोहम्मद यांचा जन्म 570 मध्ये सौदी अरेबियामध्ये झाला होता. हा उत्सव पैगंबरांचे जीवन, त्यांनी दिलेल्या शिकवणीची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो.
12 रबी उल अव्वल या दिवशी मुस्लिम धर्मियांचे पवित्रस्थळ मक्का (Makka) येथे मोहम्मद यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद मिलाद उन नबी (Eid-e-Milad Un Nabi) च्या रूपात साजरा केला जातो. ईद-ए-मिलाद उन नबी' निमित्त Wishes, Images, SMS, WhatsApp Status शेअर करून आपल्या मुस्लिम बांधवांना खास मराठी तसेच हिंदी भाषेमध्ये शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील फोटोज उपयोगात येतील. (हेही वाचा - Kojagiri Purnima 2020: यंदा 'कोजागरी पौर्णिमा' कधी आहे?; जाणून घ्या शरद पौर्णिमेचे व्रत, शुभमुहूर्त आणि महत्त्व)
गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है,
सितारों ने आसमान से सलाम भेजा है,
मुबारक हो आपको ईद का दिन,
हमने ये पैगाम भेजा है
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!

मदीने में ऐसी फिजा लग रही है
कि जन्नत की जैसी हवा लग रही है
मदीने पहुंच कर जमीन को जो देखा
यह जन्नत का जैसे पता लग रही है
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !

दुनिया की हर फिजा में उजाला रसूल का
ये सारी कायनात सदका रसूल का
खुशबू-ए-गुलाब है पसीना रसूल का
आप को भी हो मुबारक महीना रसूल का
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!

नबी की याद से रोशन
मेरे दिल का नगीना है
वो मेरे दिल में रहते हैं
मेरा दिल एक मदीना है
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!

धर्म, जात विसरून,
कास धरू माणूसकीची,
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईदची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा!

पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या कार्यकाळात इस्लाम धर्माची स्थापना केली आणि अल्लाहच्या उपासनेला समर्पित एकमेव साम्राज्य म्हणून सौदी अरेबियाचे निर्माण केले. पैगंबर मुहम्मद यांची जयंती हा एक आनंददायी सण आहे. मात्र, रबी-उल-अव्वलच्या 12 व्या दिवशी पैगंबर मुहम्मद यांचेही निधन झाले. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी पैगंबर मुहम्मद यांच्या प्रतिकात्मक पादूकांचे पूजन केले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव नमाज पाडून आपल्या दिवसाची सुरुवात करतात.